32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमहाराष्ट्रतलाठी भरती २०२३ ची यादी जाहीर

तलाठी भरती २०२३ ची यादी जाहीर

अनेक महिन्यांपासून राज्यामध्ये तलाठी भरतीवरून तरूणांनी सरकारला सुनावलं आहे. तर तलाठी भरतीबाबत कोणतंही ठेस पाऊल सरकार उचलत नव्हते. अनेक दिवसांपासून तलाठी भरती हा चर्चेचा विषय होता. उमेदवारांची निवड यादी मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली आहे. अशातच तलाठी भरती १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ मध्ये तीन टप्प्यात ५७ सत्रांमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. तलाठी पदासाठी राज्यभरातून ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज केला. त्यापैकी ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. अशातच राज्यातील २३ जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर करण्यात आली.

२३ जिल्हानिहाय यादी

जिल्हासमितीने तयार केलेल्या यादीमध्ये २३ जिल्ह्यांचा समावेश आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा,  सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

हे ही वाचा

हातात केळ दाखवत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी “एकच वादा रोहित दादा”

डिजिटल पत्रकार परिषदेचं एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

महात्मा गांधीच्या विरोधात खरंच ब्राह्मण समाज आहे का? (प्रफुल्ल फडके यांचा विशेष लेख – भाग १)

उमेदवाराची ओळख प्रमाणपत्र, निवडयादी आणि संबंधीत कागदपत्रे तसेच, वैद्यकीय तपासणी चारित्र्य पडताळणी याचप्रमाणे आऱक्षणाप्रमाणे कागद पत्रांची केलेली पडताळणी ही अंतिम नियुक्तीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हास्तरावर करण्यात य़ेईलं.

उमेदवारांकडून २०५ आक्षेप नोंदवले

संपूर्ण परीक्षेमध्ये एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदवण्यात आले. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांपैकी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या ईसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले. त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये जवळजवळ ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी