28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeमहाराष्ट्रDevendra Fadanvis : उद्धव ठाकरे खोटे बोलताहेत, केंद्र सरकारने राज्य सरकारला 28...

Devendra Fadanvis : उद्धव ठाकरे खोटे बोलताहेत, केंद्र सरकारने राज्य सरकारला 28 हजार 104 कोटी रुपये दिले

टीम लय भारी

मुंबई : मोदी सरकारने (Modi Government) ठाकरे सरकारला (Thackeray Government) आत्तापर्यंत 28 हजार 104 कोटींची मदत केली आहे. आरोग्य, अन्न, मजूर, शेतकरी या सगळ्यांसाठी केंद्राकडून निधी देण्यात आला आहे. कोरोना विरोधात लढा देत असताना केंद्राकडून हजारो कोटी रुपयांची मदत मिळूनही राज्य सरकार आम्हाला केंद्राकडून काही मिळत नसल्याचा कांगावा करत आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली.

Devendra Fadanvis : उद्धव ठाकरे खोटे बोलताहेत, केंद्र सरकारने राज्य सरकारला 28 हजार 104 कोटी रुपये दिले

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारला केंद्र सरकारनेच मदत केली आहे, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/628699807858103/?__tn__=kC-R&eid=ARC1EgGMLl5XUzQTKqI6rflznjWYKo6kd8eYNpvqQABrXHiDlBogzNxP95o9FaH3BbM8n5ESBYjc4raG&hc_ref=ART4UxBFdtf3sZd8fY64lc_sC5w47S-q8hNBP4Jc_TTQ2PqtECejvo4y4zse7mK85Jk&__xts__[0]=68.ARDDUzhtni9i00V6Irn2sjS_hdrng2WyDamP5PB6YuaT51OTg8XLRUuoANE9qNpWG8jhbtLGZq_YRh2FaOYThUg1vmm1rT3UgdnNcuJNnt-43Cp_zHiv4hTEbz61XoJW6UbdLhnLM0p-nDDyN-Cq6BQIMiLnV5hmJijStwuAJhCUnc7ZvmwE7qFSgQQCjJAeyam2GuFDxbcX26co7inUGHdgEuXqJxh0RMS7dTjMmMuaoEnufNPFCFC_0r7L6HIBs7jbfNsDIUi_NRF9lXvPArdSiIS4FQhrlS-vxzqkY6MDXynQs-iiwnK6CCsGgQI-mIoMT2tHBvkxlnVn9woobLP-xvpdwFAMXdT4j81D72xvLBRFiFGI

केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाकडून राज्य सरकारला तब्बल 28 हजार 104 कोटी रुपयांची मदत करण्यात आली. ती कशी विभागली गेली आणि कुठे खर्च करण्यासाठी देण्यात आली त्याचा तपशील फडणवीस यांनी देण्याचा प्रयत्न आपल्या फेसबूक लाइव्हमध्ये केला आहे. महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून काहीच मिळाले नाही असा आरोप केला जात असला तरी हा आरोप खोटा आहे, असे फडणवीसांनी (Devendra Fadanvis) स्पष्ट केले.

देशभरातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मृत्यू 40 टक्के याच ठिकाणी झाले. एकूणच राज्यातील परिस्थिती अतिशय वाइट आहे. एकूणच सरासरी आपण पाहिल्यास मुंबईत 3500 टेस्ट करण्यात आल्या. 32 टक्के टेस्ट पॉझिटिव्ह येत आहेत. देशात 4.5 टक्के आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस वाइट होत आहे. खासगी रुग्णालयांनी रेट वाढवले, सरकारी रुग्णालयात बेड नाहीत. प्रेत ठेवायला जागा नाहीत. त्यात राहुल गांधी सांगतात, आमचं सरकारकडून ऐकले जात नाही. हे स्टेटमेंट अतिशय आश्चर्यकारक आहे. कोरोना हाताबाहेर जात असल्याचे पाहता परिस्थितीचा ठीकरा शिवसेनेवर फोडून आपण वेगळे व्हायचे असा हा प्रयत्न दिसतंय. त्यामुळे, राहुल गांधींचे वक्तव्य जबाबदारी झटकण्यासारखे आहे. अशात राज्य सरकारचे सहकारी सुद्धा त्यांची साथ सोडत असताना दिसून येत आहेत. अशी टीका फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली.

केंद्र सरकारने काय दिले?

  • महाराष्ट्रातून 600 ट्रेन्स सोडल्या
  • श्रमिक रेल्वेसाठी 300 कोटी दिले
  • मजुरांच्या छावण्यांसाठी 1 हजार 611 कोटींचा निधी दिला
  • पीपीई आणि एन 95 मास्क यांचा पुरवठा केला
  • शेतीसाठी 9 हजार कोटींचा निधी दिला
  • एप्रिल आणि मे महिन्याचा निधी आगाऊ दिला
  • गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत 1750 कोटींचा गहू, 2620 कोटींचा तांदूळ, 100 कोटींची डाळ दिली
  • जनधन योजनेचे 1308 कोटी दिले
  • उज्ज्वला अंतर्गत 1625 कोटी दिले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी