28 C
Mumbai
Sunday, June 16, 2024
Homeमनोरंजनसलमान, कतरिना दिवाळीत देणार चाहत्यांना खुशखबर !

सलमान, कतरिना दिवाळीत देणार चाहत्यांना खुशखबर !

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कटरीना कैफ यांच्या बहुचर्चित ‘टायगर 3’ सिनेमा यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘टायगर3’ची निर्मिती करणाऱ्या यशराज फिल्म्सनं शनिवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली. यशराज फिल्मची निर्मिती असलेला ‘एक था टायगर’ या मूळ सिनेमाचा ‘टायगर3’ तिसरा भाग आहे. 2012 साली ‘एक था टायगर’ प्रदर्शित झाला होता. भारत आणि पाकिस्तान देशातील गुप्तहेरांच्या प्रेमकथेवर ‘एक था टायगर’ सिनेमाची मूळ कथा आधारली होती.

सलमाननं भारतीय गुप्तहेर संस्था ‘रॉ’ तर कतरीनानं पाकिस्तानी गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’मधील गुप्तहेराची भूमिका साकारली. मजेदार स्टंट्स,फायटिंग सीन्स आणि दर्जेदार संगीतामुळे सिनेमा चांगलाच चालला. खुद्द प्रेक्षकांनीच ‘एक था टायगर’च्या सिक्वेलची मागणी केली.

अखेरीस पाच वर्षानंतर 2017 साली ‘टायगर जिंदा है’ हा सिक्वेल प्रदर्शित झाला. ‘टायगर जिंदा है’नं कमाईचे वेगवेगळे विक्रम रचले. प्रेक्षकांचा प्रतिसाद लक्षात घेता यशराज फिल्म्सनं ‘टायगर3’ची घोषणा केली. दरम्यानच्या काळात सलमान खानच्या इतर सिनेमांना फारसं यश लाभलं नाही. गेल्या अकरा वर्षात सलमान खानचे ‘एक था टायगर’,’बजरंगी भाईजान’,’दबंग’ सिरीज वगळता एकामागोमाग एक सिनेमे दणाणून आपटले.

हे सुद्धा वाचा 

एक फुल, दोन हाफ…. कुणाला म्हणाले उद्धव ठाकरे!

Happy Birthday इशांत शर्मा | क्रिकेटशिवाय इशांतला आवडतात ह्या गोष्टी..

संरपंचाने पेटवली स्वत:ची कार; मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा नोंदवला निषेध

सलमानचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. सलमान खान निवृत्ती घ्यावी, अशी मागणीही नेटीझन्सनं केली. कतरिना कैफचा ‘फोनभूत’ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. आता सर्वांच्या आशा ‘टायगर3’ वर खिळून राहिल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी