30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रनाशकात कर्जाचे आमिष दाखवत विधवा महिलांची फसवणूक

नाशकात कर्जाचे आमिष दाखवत विधवा महिलांची फसवणूक

विधवा महिलांना व्यवसायासाठी बिगर फेडीचे ५० हजाराचे कर्ज काढून देण्याचे अमिष दाखवून दोघा संशयित महिलांनी ६ लाखांची फसवणूक केली आहे. याबाबत पिडीतांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात धाव घेत या दोघा संशयित महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एक महिला दुसऱ्या महिलेचे दुःख समजू शकते असा आपल्या समाजात म्हटले जाते. त्यात विधवा महिलांना मदत करणे म्हणजे एकप्रकारचे पुण्य कमावणे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र, याच विधवा महिलांच्या एकटे पणाचा गैर फायदा कोणी पुरुषाने नाहीतर थेट दोघा भामट्या महिलांनी घेतल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे. बिगर फेडीचे कर्ज मिळवून देण्याच्या बदल्यात या भामट्या महिलांनी अनेक विधवा महिलांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून त्याबाबत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि रुही नियामत पठाण, ३०, रा. अमरदीप अपार्टमेंट, बापू बंगला इंदिरानगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित महिला नगमा रफिक सैय्यद, रा. भारतनगर, मुंबईनाका आणि निलोफर आझाद शेख, रा. रेणुकानगर, नाशिक यांनी १ नोव्हेंबर २०२२ पासून ते ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत विधवा महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी बिगर फेडीचे ५० हजार रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. यासाठी प्रोसेसिंग फी म्हणून पीडित महिलांकडून १ हजार रुपये घेतले होते. मात्र, अनेक महिने आणि वर्ष उलटून देखील कुठलेही कर्ज मंजूर केले नाही आणि घेतलेली प्रोसेसिंग फी परत केली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पीडित महिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी मुंबईनाका पोलीस ठाणे गाठून संशयित महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी