35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeव्हिडीओअरे बाप रे! चालकाशिवाय 80 च्या स्पीडने धावली मालगाडी, Video पाहून तुम्हीही...

अरे बाप रे! चालकाशिवाय 80 च्या स्पीडने धावली मालगाडी, Video पाहून तुम्हीही व्हाल 

एखाद्या रेल्वे ट्रॅकवरून 80 च्या स्पीडने मालगाडी धावू लागली आणि तेही चालकाशिवाय… आश्चर्य वाटलं ना? पण हे खरंय! कारण सोशल मीडियावर चालकाशिवाय भरधाव वेगाने जाणाऱ्या मालगाडीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. ही मालगाडी जम्मूहून पंजाबकडे निघालीय आणि वाटेत ज्या स्टेशनवरून चाललीय, तिथे निरीक्षक शिट्टी वाजवून थांबविण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा काहीच उपयोग होत नाही. कारण, त्या गाडीच चालकच नाहीये. 

समोर आलेली माहिती अशी की, 80 च्या स्पीडने ही मालगाडी कसलंही कंट्रोल नसताना धावत होती. या भरधाव मालगाडीने मुकेरिया स्टेशन सोडून दसुहा स्थानक ओलांडलं. त्यावेळी या मालगाडीचा व्हिडीओ शूट करण्यात आला. गाडी नियंत्रणात आली नाही, तर ती जालंधर जिल्ह्यातील तांडा आणि भोगपूर मार्गे काला बाकरा पार करून जालंधरमध्ये प्रवेश करेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. 

अखेर चालकाशिवाय धावणाऱ्या या मालगाडीसा मुकेरियनजवळ उची बस्सी येथे थांबविण्यात आलं आहे. रोलडाऊनमुळे जम्मूहून ड्रायव्हर आणि गार्डशिवाय निघालेली मालगाडी अखेर पंजाबमधील मुकेरियनजवळ थांबवण्यात आली आहे. रोलडाऊनमुळे मालगाडी अचानक पुढे जाऊ लागली आणि त्यानंतर तिचा वेगही चांगलाच वाढला. तब्बल 160 किलोमीटर अंतर कापल्यानंतर ही मालगाडी थांबली.

…अशी थांबविण्यात आली चालकाशिवाय चालणारी मालगाडी!

पठाणकोटतील दमतल येथून धावणारी मालगाडी 100 किमी प्रति तास वेगाने चालकविना रुळावर धावत होती. तिला थांबवण्याची अलवलपूरमध्ये तयारी सुरू करण्यात आली होती. ट्रॅक रिकामा करा, अशी घोषणा स्थानकांवर केली. त्यानंतर उची बस्सी येथे वीजपुरवठा बंद करण्यात आला आणि ही मालगाडी थांबविण्यात आली. सुदैवाने ही गाडी थांबली आणि होणार मोठा अपघात टळला. मालगाडी थांबल्यानंतर रेल्वे प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी