33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
HomeराजकीयSanjay Raut : प्रकाश आंबेडकर मायावतींच्या मार्गाने जाणार नाहीत, संजय राउतांचा विश्वास

Sanjay Raut : प्रकाश आंबेडकर मायावतींच्या मार्गाने जाणार नाहीत, संजय राउतांचा विश्वास

“देशातून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही वर्षांनी देशात एकच पक्ष असेल. त्यामुळे देशात लोकशाही टिकावी यासाठीच महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आलेले आहेत. संविधान वाचविण्यासाठी प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आलेले आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर कधीही वेगळा निर्णय घेणार नाहीत”, असे मत संजय राऊत यांनी मांडले आहे. 

“27 तारखेला महाविकास आघाडीची बैठक आहे. आम्ही अत्यंत सन्मानाने वंचित बहुजन आघाडीला चर्चेला बोलावले आहे. जागावाटपाची चर्चा एकत्र होईल. आधी 3 पक्षांनी जागावाटप करावे आणि त्यानंतर आम्हाला हव्या त्या जागा आम्ही मागून घेऊ अशी त्यांची भूमिका आहे. परंतु अशाप्रकारे जागावाटप जगाच्या इतिहासात कधी होत नाही. आंबेडकरांना राजकारण उत्तम कळते, त्यांना भूमिकाही कळतात. त्यांना कुठल्या जागा हव्यात त्या आम्ही द्यायला तयार आहोत. आम्ही त्यांच्या भूमिकेवर बैठकीत चर्चा करू. प्रकाश आंबेडकर वेगळी भूमिका घेणार नाहीत”, असे मत संजय राऊत मांडले आहे.

राऊत म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे. आम्हाला मविआचा घटक करून घ्या ही त्यांची मागणी आणि भूमिका होती. त्यानुसार त्यांच्या विनंतीस मान देऊन वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घेतले. त्यामुळे मविआच्या बैठकीत ते सहभागी होतात. लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चेतही ते सहभागी होतात. या देशात संविधान वाचवण्यासाठी लढाई आहे. हे प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे. कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. आम्ही संविधान वाचवण्यासाठी सगळे संघर्ष करतोय. मोदी-शाह यांच्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी ज्यांचे एकमेकांसोबत मतभेद आहेत हे पक्षही काँग्रेससह एकत्रित आलेत.” 

 

“उत्तर प्रदेशात मायावतींचा मार्ग वेगळा आहे. कारण त्यांना अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करायचीय. प्रकाश आंबेडकर हे मायावतींच्या मार्गाने जाणार नाहीत हा विश्वास आहे. कारण देशातील संविधान वाचवणे ही आमच्या इतकीच त्यांची जबाबदारी आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेली घटना, लोकशाहीचे रक्षण करणे हे आमच्या इतकेच प्रकाश आंबेडकरांचेही कर्तव्य आहे. वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवलाय. आमच्या बैठकीत ते सहभागी होतात. प्रकाश आंबेडकर यांच्या त्यांच्या भूमिका जाहीरपणे मांडत असतील, हा त्यांचा प्रश्न आहे”, असे राउतांनी स्पष्ट केले. 

वंचित बहुजन आघाडीने पत्रात नेमकं काय म्हंटलंय? 

वंचित बहुजन आघाडीने या पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या गुरुवारी, २२ फेब्रुवारीला झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये ३९ जागांवर एकमत झाले असून, येत्या २७ किंवा २८ फेब्रुवारीला औपचारिक आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चेन्नीथला म्हणाले की, काँग्रेसने किमान समान कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रस्तावित ३९ कलमी अजेंडा स्वीकारला आहे, मात्र वंचित बहुजन आघाडीकडून जागांची मागणी अद्याप आलेली नाही.

वंचितने म्हटलं आहे की, किमान समान कार्यक्रमासाठी आमचा प्रस्तावित ३९ कलमी अजेंडा काँग्रेसने स्वीकारल्याचे आम्ही स्वागत करतो. आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना विनंती करतो की, त्यांनी किमान समान कार्यक्रमासाठी त्यांचे प्रस्ताव दाखवावे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप-आरएसएसच्या लोकशाही आणि जनताविरोधी सरकारपासून स्वत:ला वेगळे करण्यासाठी आणि आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने तिन्ही पक्षांच्या सूचनांसह किमान समान कार्यक्रम तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

“बाळासाहेब आंबेडकर यांच्या कालच्या अकोल्यातील पत्रकार परिषदेतील वक्तव्य आम्ही तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो. महाविकास आघाडीत आत्तापर्यंत जागा वाटपासंदर्भात काय ठरलंय, हे वंचित बहुजन आघाडीला कळवावं, अशी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत. आम्ही हीच मागणी २ फेब्रुवारीला मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या तीन पक्षांच्या प्रतिनिधींसोबतच्या शेवटच्या बैठकीतही केली होती. महाविकास आघाडीने जागा वाटपासंदर्भातील भूमिका वंचित बहुजन आघाडीला सांगितल्यास, ३ पक्षांना वैयक्तिकरित्या किती जागा दिल्या आहेत हे समजायला मदत होईल. तसेच, तीन पक्षांना किती जागा मिळाल्या आहेत, हे समजल्यावर त्या पक्षांशी वंचित बहुजन आघाडीला काही जागांसाठी वाटाघाटी करता येतील. उदाहरणार्थ, जर मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ काँग्रेस/राष्ट्रवादी काँग्रेस/शिवसेना यांना दिला गेल्यास, आम्ही ज्या पक्षाला मुंबई दक्षिण मध्य हा मतदारसंघ दिला आहे त्यांच्याशी वाटाघाटी करू. परंतु, वाटाघाटी होण्यासाठी मुंबई दक्षिण मध्य किंवा कोणत्या पक्षाला त्यांच्या कोट्यातील कोणता मतदारसंघ मिळाला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही 3 पक्षांमध्ये तुमच्या ठरलेल्या जागांची माहिती कोणत्याही प्रसारमाध्यमातून किंवा वृत्तपत्राद्वारे आम्हाला कळवा. जेणेकरून, जागावाटपाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवता येईल.”

वंचितने आपल्या पत्रात म्हटलं आहे की, महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दोन दिवसांच्या आत त्यांच्या जागांच्या वाटपांची माहिती दिली (डेडलाइन नाही पण आमच्या सोयीसाठी) तर आम्हाला निर्णय घेणे सोपे होईल. आम्ही तुम्हाला जागा वाटपासंदर्भात माहिती पुरवण्याची विनंती करतो, जेणेकरुन आम्हाला कोणासोबत बसायचे आहे, चर्चा करायची आहे हे ठरवता येईल. तसेच, आगामी निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजप-आरएसएसचा पराभव करण्यासाठी जागांची तडजोड करण्यास सोपं जाईल.

हेही वाचा : “दुसऱ्यांचे घर फोडण्यात शरद पवारांचे आयुष्य गेले, त्यामुळेच…”, भाजपची घणाघाती टीका

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी