35 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमंत्रालयAjit Pawar : अजितदादांकडे हसन मुश्रीफांनी आग्रह धरला, अन् लोकहिताची योजना अंमलात...

Ajit Pawar : अजितदादांकडे हसन मुश्रीफांनी आग्रह धरला, अन् लोकहिताची योजना अंमलात आली

टीम लय भारी

मुंबई : राज्यभरातील लोकांचे हित सामावले आहे म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘त्या’ दोन्ही योजनांसाठी जोरदार पाठपुरावा केला. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांची भेट घेतली. योजनांची तात्काळ अंमलबजावणी व्हावी असा आग्रह त्यांनी अजितदादांकडे धरला.

हसन मुश्रीफांच्या या पाठपुराव्यामुळेच शनिवारी ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा आदेश जारी झाला. त्या अगोदर दोन दिवस खासगी रूग्णालयांमधील 80 टक्के जागांवर सरकारी नियंत्रण आणण्याचा निर्णय झाला होता.

Mahavikas Aghadi

या दोन्ही निर्णयांचे प्रस्ताव राजेश टोपे यांनी त्यांच्या खात्यामार्फत तयार केले होते. स्वतः राजेश टोपे ( Ajit Pawar ) या दोन्ही प्रस्तावांवर तात्काळ निर्णय व्हावा यासाठी आग्रही होते. परंतु वित्त विभागामध्ये हे निर्णय काहीसे प्रलंबित झाले होते.

दुसऱ्या बाजूला अनेक आर्थिक बाबींमुळे नाडलेल्या अनेक रूग्णांचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना सतत फोन येत होते. त्यामुळे या दोन्ही योजना मार्गी लागाव्यात यासाठी मुश्रीफांनी आग्रह धरला.

त्यासाठी ते अजितदादांना ( Ajit Pawar ) जाऊन भेटले. हे दोन्ही आदेश लवकर जारी करा अशी त्यांनी अजितदादांना विनंती केली.

मुश्रीफांच्या या आग्रहामुळे अजितदादांनी ( Ajit Pawar ) लगेचच प्रस्ताव मंजूर करण्याची तजवीज केली. प्रस्ताव घेऊन अधिकारी अजितदादांच्या प्रेमकोट या खासगी निवासस्थानी आले तेव्हा अवघ्या एका मिनिटात अजितदादांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केली.

त्यानंतर एका मागोमाग दोन्ही निर्णय जारी झाले. या दोन्ही निर्णयांमुळे सामान्य लोकांना मोफत व कमी दरांत वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली.

राजेश टोपे यांचा आग्रह व हसन मुश्रीफ यांचा पाठपुरावा यांमुळे लोकहिताचे हे दोन्ही मोठे निर्णय मार्गी लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

अजित पवार स्वत:च कारचं सारथ्य करतात तेव्हा…

Ajit Pawar …अन् अजितदादांनी ‘त्या’ फाईलवर एका मिनिटात, तर मुख्यमंत्र्यांनी दहा मिनिटांत सही केली

Mahavikas Aghadi : उद्धव ठाकरे, अजितदादा, राजेश टोपे यांचा मोठा निर्णय, जगात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला मिळणार ‘ही’ सुविधा

Coronavirus Lockdown: Ajit Pawar Asks Maharashtra Ministers To Ensure Smooth Supply Of Food Grains

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी