29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमंत्रालयदेवेंद्र फडणविसांचे बोलून झाले, अन् अजितदादांनी फवारा मारला

देवेंद्र फडणविसांचे बोलून झाले, अन् अजितदादांनी फवारा मारला

टीम लय भारी

मुंबई : स्पष्टपणा व रोखठोक अशी अजितदादा पवार यांची प्रतिमा आहे. पण रोखठोक भूमिका मांडताना ते अनेकदा विनोदही फुलवत असतात. याची प्रचिती नुकतीच आली ( Ajit Pawar witty speech at Vidhanbhavan ).

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप सोहळा बुधवारी विधानभवनात पार पडला ( RajaramBapu patil’s birth anniversary ). त्यावेळी अजितदादांनी केलेल्या कृतीने एक आदर्श उदाहरण दाखवून दिले. पण या उदाहरणातून सभागृहात हास्याची कांरजीही फुलली.

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

या सोहळ्याप्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. फडणवीस यांच्या भाषणानंतर अजितदादा माईक जवळ आले. पण बोलायला सुरूवात करण्याअगोदर अजितदादांनी खिशातून सॅनिटायझरचा स्प्रे काढला. ‘नको बाबा कोरोना हुईल’ असे सांगत माईकवर सॅनिटायझरचा फवारा मारला ( Ajit Pawar’s speech at Vidhanbhavan ). अजितदादांच्या या कृतीने सभागृहात मात्र हास्याचा फवारा उडाला.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरेंच्या कार्यालयात बदल्यांच्या फाईलींचा ढीग

अजितदादा म्हणाले, जयंत पाटील माझ्यावर कारवाई करतील

Breaking : उद्धव ठाकरे, अजितदादांचा 2 कोटी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, गुगलसोबत केला करार

Breaking : उद्धव ठाकरे, अजितदादांचा 2 कोटी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, गुगलसोबत केला करार

मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय, वाचा काय आहेत निर्णय ?

‘कुणाचे काय सांगता येत नाही. त्यामुळे आपण काळजी घेतलेली बरी’ अशीही पुस्ती अजितदादांनी जोडली. अजितदादांच्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण होणार होते. दादांनी आपले भाषण पूर्ण केल्यानंतर पुन्हा खिशातून स्प्रे काढला, अन् माईकवर फवारला. ‘आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको’ असे सांगायला ते विसरले नाहीत.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी