28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजउद्धव ठाकरेंच्या कार्यालयात बदल्यांच्या फाईलींचा ढीग

उद्धव ठाकरेंच्या कार्यालयात बदल्यांच्या फाईलींचा ढीग

टीम लय भारी

मुंबई : ‘विनंती बदल्या’ असे ‘गोजिरवाणे’ नाव असलेल्या, पण प्रत्यक्षात ‘मलिदा’ मिळवून देणाऱ्या शंभर ते दीडशे फायली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयात आहेत. या फायलींकडे राज्यभरातील शेकडो अधिकाऱ्यांचे डोळे लागले आहेत ( Transfers files at Uddhav Thackeray’s office).

‘बदली कायद्या’नुसार दर तीन वर्षानंतर केल्या जाणाऱ्या नियमित बदल्या १० ऑगस्ट रोजी पूर्ण झाल्या. प्रत्येक खात्यांच्या मंत्र्यांनी आपल्या अधिकारात या बदल्यांना मंजुरी दिल्या व त्याचे आदेशही जारी झाले ( Mahavikas Aghadi Government decision on transfers ).

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

पण नियमित बदल्यांपेक्षा खरा मलिदा हा ‘विनंती बदल्यां’मध्ये असतो. एक प्रकारे कायद्यातून पळवाट काढून केलेल्या या बदल्या असतात.

या विनंती बदल्यांना मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक असते. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय विनंती बदल्या होत नाहीत. त्यानुसार प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांनी विनंती बदल्यांच्या फायली मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठविल्या आहेत ( Ministers sent files to Uddhav Thackeray ).

विनंती, तक्रारींच्या नावाखाली या बदल्या होतात. परंतु बहुतांश बदली प्रकरणांमध्ये खरे कारण हे मलईदार पदे मिळविणे हेच असते. मलईदार पदांसाठी अधिकारी वाटेल ती किंमत मोजायला तयार होतात. मंत्रीही अशा अधिकाऱ्यांची वाटच पाहत असतात ( Corruption in Mahavikas Aghadi government ).

हे सुद्धा वाचा

मंत्रालयात भरलाय बदल्यांचा बाजार

Breaking : तहसिलदारांच्या बदल्यांचा आदेश जारी; वाचा तुमच्या तालुक्यात कोण आले, कोण गेले

Breaking : उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर; वाचा तुमच्या जिल्ह्यात कोण आले, कोण गेले

सहकारच्या 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या, खोके – पेट्यांची जोरदार चर्चा

सहकारच्या 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या, खोके – पेट्यांची जोरदार चर्चा

राजेश टोपे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, आयुक्तांवर नाराज

‘सातारा हॉस्पीटल’वर मंत्रालयातून कारवाईचे आदेश

एकेका जागेसाठी ‘कोरोडों’चे मूल्य लागू करून अधिकाऱ्यांनी मलईदार पदे विकत घेतली आहेत. काही खात्यांच्या मंत्र्यांनी इतक्या घाऊक बदल्या केल्या आहेत की,  या खात्यात अगदी ५० ते १०० कोटींपर्यंत उलाढाल झाली असेल, असे सूत्रांनी सांगितले.

अत्यंत मौल्यवान असलेल्या या ‘विनंती बदल्यां’च्या फायली गेल्या चार दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आहेत. मुख्यमंत्र्यांचे विविध अधिकारी या फायलींची छानणी करीत आहेत. छानणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना मंजुरी दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

महसूलच्या बदल्यांमध्ये उद्धव ठाकरे, अजितदादांचेच वर्चस्व

महसूल खात्याचे मंत्रीपद बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. परंतु या खात्यातील महत्वाच्या बदल्यांचे निर्णय उद्धव ठाकरे व अजितदादा पवार यांनीच घेतले आहेत ( Uddhav Thackeray and Ajit Pawar has power of officers transfers). विशेषतः मुंबईचे अधिकार ठाकरे यांच्याकडे, तर पुण्याचे अधिकार अजितदादादांकडे अशा पद्धतीने वाटप झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

महसूल, गृह, कृषी, ग्रामविकास, वन, पीडब्ल्यूडी इत्यादी खात्यांमध्येही बदल्यांचे जोरदार व्यवहार झाले आहेत.

अनेक अधिकाऱ्यांवर अन्याय

‘मलईदार पदां’साठी लक्ष्मीदर्शन दाखवून अनेक अधिकाऱ्यांनी हव्या त्या ठिकाणी बदल्या मिळविल्या आहेत. पण काही अधिकाऱ्यांची मात्र तीन वर्षे पूर्ण व्हायच्या अगोदरच उचलबांगडी करण्यात आली आहे. यामध्ये काही कार्यक्षम अधिकाऱ्यांवरही अन्याय करण्यात आला असल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

फायलींची छानणी प्रक्रिया सुरू असून येत्या ४ ते ७ दिवसांत ही छानणी पूर्ण होऊन त्यांना मंजुरी दिली जाऊ शकते, अशी माहिती या सूत्रांनी दिली.

मंत्र्यांसोबत अधिकाऱ्यांचेही चांगभले

बदलीच्या बाजारात मंत्र्यांबरोबरच त्यांच्या कार्यालयातील खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी यांनीही मलईवर ताव मारला असल्याचे सूत्रांनी सांगितले. मतदारसंघात चांगला अधिकारी हवा असे सांगत अनेक आमदार, खासदारांनीही बदल्यांचा माध्यमातून आपलाही वाटा मिळविल्याचे सूत्रांनी म्हणणे आहे.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी