28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeमंत्रालयIAS Transfers : राधाकृष्ण विखे पाटलांची इच्छा पूर्ण झाली, तुकाराम मुंढे...

IAS Transfers : राधाकृष्ण विखे पाटलांची इच्छा पूर्ण झाली, तुकाराम मुंढे आले सोबतीला; राज्यातील ४१ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच आहे. आज राज्य शासनाने तब्बल ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आपल्या आतापर्यंतच्या सेवा काळात ज्यांनी बदल्यांचा रेकॉर्डच मोडलेला आहे, त्या आएएस तुकाराम मुंडे यांची बदली राधाकृष्ण विखे-पाटील मंत्री असलेल्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय खात्याच्या सचिवपदी झाली आहे.

कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान खात्याच्या आयुक्तपदावर असाताना तुकाराम मुंडे यांनी सरकारी रुग्णालयांची झाडाझडती घेत खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या सरकारी डॉक्टरांना थेट डिसमीस करण्याचा इशारा देखील दिला होता. त्यानंतर काही दिवसांत तुकाराम मुंडे यांची बदली झाली होती. काही महिन्यांपूर्वी मुंढे यांची यांची कृषी खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय खात्यांचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मात्र मुंढेंना आपल्या खात्यात घेण्यासाठी उत्सुक होते. त्यानंतर त्यांची बदली पशुसंवर्धन खात्याच्या मुख्य सचिवपदावर करण्यात आली होती. मात्र ते त्यावेळी ट्रेनिंगसाठी परदेशात होते. मुंढे यांनी या खात्याचा पदभार घेण्याआधीच त्यांची बदली मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी बदली झाली.

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना मात्र तुकाराम मुंडे आपल्या खात्याच्या सचिवपदी असावे असे वाटत होते. आज तुकाराम मुंडे यांची बदली मराठी भाषा विभागाच्या सचिव पदावरुन पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय खात्याच्या सचिवपदी झाल्याने मंत्री विखे पाटलांना जो अधिकारी आपल्या खात्यात हवा होता तोच अधिकारी मिळाला आहे.

आएएस एधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे : 

१) राजेंद्र क्षिरसागर यांची मुख्य सचिव कार्यालयाच्या सहसचिव पदावरुन आता मुंबई शहरचे जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे.
२) नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांची जिल्हाधिकारी लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३) कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ संजय चव्हाण यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४) पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांची जिल्हाधिकारी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५) धुळे जिल्हा परिषदेच्या सीईओ श्रीमती बुवनेश्वरी यांची जिल्हाधिकारी, वाशिम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
६) मंबई महापालिकेचे सह आयुक्त अजित कुंभार यांची अकोला येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
७) यवतमाळ जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. श्रीकृष्णनाथ बी. पांचाळ, यांची जिल्हाधिकारी, जालना म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
८) जळगाव जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. पंकज आशिया यांची यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
९) गडचिरोली झेडपीचे सीईओ कुमार आशीर्वाद यांची जिल्हाधिकारी, सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१०) लातूर झेडपीचे सीईओ अभिनव गोयल यांची जिल्हाधिकारी, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
११) अकोला झेडपीचे सीईओ सौरभ कटियार यांची जिल्हाधिकारी, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१२) धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी सह-सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., सांगली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१३) गडचिरोली जिल्हाधिकारी प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. अंकित यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१४) गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, ZP, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१५) नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक मीनल करनवाल यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१६) गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी सह-सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१६) गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी सह-सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१७) प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, सोलापूर मनीषा माणिकराव आव्हाळे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१८) प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी धारणी, अमरावतीचे सावन कुमार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नंदुरबार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१९) अनमोल सहाय्यक जिल्हाधिकारी, देवरी उपविभाग, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२०) आयुषी सिंह प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार, ITDP, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२१) श्रीमती. वैष्णवी बी., सहायक जिल्हाधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., अकोला येथे करण्यात आली आहे.
२२) श्रीमती पवनीत कौर जिल्हाधिकारी, अमरावती यांची संचालक, GSDA, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२३) गंगाथरण डी, जिल्हाधिकारी, नाशिक यांची बृहन्मुंबई महानगरपालिका सह आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२४) अमोल जगन्नाथ येडगे, जिल्हाधिकारी, यवतमाळ यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२५) नमुगराजन एस, जिल्हाधिकारी, वाशिम यांची अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२६) विजय चंद्रकांत राठोड, जिल्हाधिकारी, जालना यांची सह मुख्य कार्यकारी अधिकारी, Mah.Industrial Devp.Corpn., मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२७) श्रीमती. निमा अरोरा. जिल्हाधिकारी अकोला यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२८). श्री वैभव दासू वाघमारे यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२९) श्री संतोष सी. पाटील उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., कोल्हापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३०) आर.के.गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नंदुरबार यांची जिल्हाधिकारी, परभणी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३१) श्रीमती. आंचल गोयल जिल्हाधिकारी, परभणी यांना अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
३२) संजय खंदारे, यांची मुख्य सचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३३) तुकाराम मुंढे सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई यांची सचिव (AD), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३४) जलज शर्मा. जिल्हाधिकारी धुळे यांची जिल्हाधिकारी, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३५) डॉ.ए.एन.करंजकर आयुक्त, ESIS, मुंबई यांची महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३६) आर.एस.चव्हाण, सहसचिव, महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३७) श्री. पृथ्वीराज बी.पी. जिल्हाधिकारी, लातूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३८) रुचेश जयवंशी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, NRLM, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३९) मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी, राज्य आरोग्य विमा संस्था, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४०) मकरंद देशमुख उपायुक्त (महसूल), कोकण विभाग, मुंबई यांची सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४१) डॉ. बी. एन. बस्तेवाड मुख्य महाव्यवस्थापक (L&S), MSRDC, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., रायगड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा 

अतूल भातखळकरांच्या ‘त्या’ ट्विटनंतर नाना पटोले भडकले!

शाळाबाह्य नऊ हजार मुलांना शाळेत आणले – शिक्षणमंत्री

डोंगराच्या कपारीत गाव वसलेले, सायकल देखील जावू शकत नाही; एकनाथ शिंदे यांनी सांगितला इर्शाळवाडीच्या काळरात्रीचा अनुभव!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी