27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमंत्रालयमंत्र्यांच्या पीएस आणि ओएसडींचे आजपासून खास प्रशिक्षण

मंत्र्यांच्या पीएस आणि ओएसडींचे आजपासून खास प्रशिक्षण

राज्यातील सर्व मंत्र्यांचे (Minister) खासगी सचिव (PS) आणि विशेष कार्य अधिकारी (OSD) यांचे पुणे येथे शुक्रवारी (दि.१०) आणि शविवारी (दि.११) असे दोन दिवस खास प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. त्यामुळे दोन दिवस मंत्रालयात शुकशुकाट असणार आहे. मंत्र्यांचे पीएस, आणि ओएसडी पुण्यात प्रशिक्षणासाठी जाणार असून मंत्र्यांची कार्यालये ओस पडणार आहेत, त्यामुळे विविध कामांसाठी मंत्र्यांकडे येणाऱ्या लोकांसाठी हे दोन दिवस गैरसोयीचे ठरु शकतात. (Ministers PS and OSD Two days special training in pune)

मंत्र्यांच्या खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाची जबाबदारीचे स्वरुप काय आहे हे अवगत करुन देणे, मंत्रालयीन कामकाज, विधीमंडळ कामकाज, तसेच विकास कामे त्यांच्यातील समन्वय आणि त्याकामांचा पाठपूरावा करणे, माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी, वेळेचे व्यवस्थापन याबद्दलचे प्रशिक्षण देणे त्याच बरोबर माध्यमांसोबत कसा संवाद ठेवावा याबाबत देखील मौलिक असे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी पीएस आणि ओएसडींना वरील विषयांसंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. पुण्यातील महाराष्ट्र राज्य विद्या शाखा विकास अकॅडमी (MSFDA) येथे हे प्रशिक्षण पार पडणार आहे.

हे सुद्धा वाचा

हार-तुऱ्यांएवजी तुम्ही मला जनतेची आरोग्यदायी भेट दिली; एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंताचे केले जाहीर कौतुक !

शरद पवारांचे सरकार काँग्रसेने पाडले; राज्यसभेत मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

नाना पटोले यांनी घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता, शिवसेनेने आघाडीधर्म पाळावा: लोंढे

मंत्र्यांचे पीएस, आणि ओएसडी यांना त्यांच्या कामातील क्षमता वाढविण्याच्या दृष्टीकोणातून हे शिबिर घेण्यात आले आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस सर्वच मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी मंत्रालयात उपलब्ध असणार नाहीत. मंत्रालयात ऐरवी अभ्यांगतांची मोठी रेलचेल असते, अनेक कामे घेऊन राज्यातून लोक मंत्र्यांकडे येत असतात. राज्यभरातून मंत्र्यांकडे येणाऱ्या लोकांशी भेटणे त्यांना मार्गदर्शन करणे, तसेच मंत्र्यांच्या दैनंदीन कामकाजाची आखणी करणे, अशी विविध कामे पीएस, ओएसडी पार पाडत असतात. तसेच मंत्र्यांच्या खात्यातील विविध कामांचा देखील पाठपूरावा ते करतात. या सर्व बाबींमध्ये त्यांच्या कामकाजातील क्षमतावाढीसाठी त्यांना पुढचे दोन दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी