27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमंत्रालयस्वर्गीय आर. आर. पाटलांनी पोलिसांच्या कल्याणासाठी कष्ट घेतले होते, त्यांच्या पत्नीही चालवताहेत...

स्वर्गीय आर. आर. पाटलांनी पोलिसांच्या कल्याणासाठी कष्ट घेतले होते, त्यांच्या पत्नीही चालवताहेत तोच वारसा

टीम  लय भारी 

मुंबई : आमदार सुमनताईं पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे महाराष्ट्र राज्य पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत रेल्वे प्रवास करता यावा अशी मागणी केली. सुमनताईं पाटील यांनी एक पत्र लिहून ही मागणी केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील पोलिसांना कर्तव्य बजावताना रेल्वे प्रवास करावा लागतो. त्यावेळी त्यांना या प्रवासाचे तिकिट घेतल्याखेरीज प्रवास करता येत नाही. सदर प्रवासाचे बिले मिळण्यास विलंब होत असल्यामुळे पोलिसांमध्ये नाराजी पसरते आहे. त्यांच्या कामावर परिणाम होतं असतो. MLA Suman Patil and Rohit Patil having big responsibility

त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे व राज्यातील इतर सर्व पोलिसांना रेल्वे प्रवास मोफत करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपणांस विनंती की, राज्यातील सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवास मोफत करण्याचा निर्णय घ्यावा अशी विनंती आहे.

महाराष्ट्राचे लाडके आबा आपल्यात नाही यांची खंत आपल्यासह अनेकांच्या मनात आहे. मात्र आबांचा वारसा त्यांचा पत्नी तसेच तासगाव आणि कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील आणि मुलगा रोहित पाटील हे सर्मथपणे चालवत आहे.

कवठेमहांकळ नगरपंचायती मध्ये रोहित पवारांनी १७ पैकी १० जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला होता. रोहित पाटलांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी कवठेमहांकाळ नगर पंचायत निवडणुकीमध्ये झाली होती.

माजी खासदार संजय काका पाटील, शिवसेनेचे नेते माजी मंत्री अजित घोरपडे, राष्ट्रवादीचा एक गट आणि काँग्रेस अशी शेतकरी विकास आघाडी रोहित पाटलांच्या विरोधात होती. अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे.

हे सुध्दा वाचा 

आर. आर. पाटील यांच्या घरात तिघांना करोना; आता आमदार सुमन पाटील यांनाही लागण

कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांची एकहाती सत्ता

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी