31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रसदाभाऊ खोत म्हणाले, सत्तेतील वळू बैलांना पोसायची जबाबदारी शेतकऱ्यांची नाही

सदाभाऊ खोत म्हणाले, सत्तेतील वळू बैलांना पोसायची जबाबदारी शेतकऱ्यांची नाही

टीम लय भारी

मुंबई : शेतकऱ्याला त्याचा शेतमाल कुठेही नेऊन विकायचा अधिकार असला पाहीजे. बाजार समित्यांमध्येच माल विकायचे बंधन शेतकऱ्यांना घालणे चुकीचे आहे, अशी भूमिका आमदार सदाभाऊ खोत यांनी  विधानपरिषदेत (Sadabhau Khot raised question in Vidhanparishad) मांडली. बाजार समित्यांमध्ये राजकीय सत्ता असते. या समित्यांमधील वळू बैलांना पोसायची जबाबदारी शेतकऱ्यांची नाही, अशा शब्दांत खोत यांनी सरकारवर निशाणा साधला.

खोत म्हणाले की, सन २००५ मध्ये याच सभागृहात कंत्राटी शेतीचा कायदा मंजूर केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस ( Sadabhau Khot said that, Market was opened in Devendra Fadnavis Government tenure) सरकारने शेतकऱ्यांना आपला शेतमाल कुठेही नेवून विकायचा मार्ग खुला केला. पण विद्यमान सरकारला शेतकऱ्यांना गुलाम बनवायचे आहे.

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे आणले होते. या कायद्यांना केवळ दोन राज्यांचाच विरोध होता. उत्तर प्रदेशचा(Uttar Predesh) विरोध नव्हता हे तेथील मतदारांनी मतपेटीतून दाखवून दिले आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन (Farmer Protest) केले. या आंदोलनात मेलेले लोक सरकारने मारले नाहीत, असेही सदाभाऊ खोत(Sadabhu Khot) म्हणाले. तुमचे सरकार(Government)आजन्म सत्तेवर राहणार नाही. तुम्ही शेतकऱ्याच्या ताटात माती कालवू नका, असा इशाराही खोत यांनी दिला

हे सुध्दा वाचा 

अत्यवस्थ वडिलांना दिलेल्या शब्दाला फडणवीस जागले! सदाभाऊंनी सांगितली आठवण

शेतकरी उपाशी मात्र कारखानदार तुपाशी, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली शेतकऱ्यांची भूमिका

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी