35 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमंत्रालयउद्धव ठाकरेंनी भाजपला दिली ‘महाराष्ट्रद्वेष्ट्यां’ची उपमा

उद्धव ठाकरेंनी भाजपला दिली ‘महाराष्ट्रद्वेष्ट्यां’ची उपमा

टीम लय भारी

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी भाजपला ‘महाराष्ट्रद्वेष्टी’ अशी उपमा दिली आहे. महाराष्ट्रद्वेष्ट्यांनी मुंबई  व महाराष्ट्राच्या विकासात मीठाचा खडा टाकू नये, अशा शब्दांत त्यांनी भाजपला सुनावले आहे ( Uddhav Thackeray scathing to BJP ).

मुंबईत अंमली पदार्थांची शेती पिकत असल्याची बदनामी काहीजणांनी केल्याचे सांगत ठाकरे यांनी कंगना रनौतलाही नाव घेता पुन्हा एकदा फटकारले. ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते ( Uddhav Thackeray attacks to Kangana Ranaut ).

कांजूरमार्ग येथील जमीन महाराष्ट्र सरकारच्या मालकीचीच आहे. पण काहीजण ती मीठागराची असल्याचे सांगत आहेत. पण हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. मुंबई व राज्याच्या हिताचे जे काही आहे ते मी करणारच असेही ठाकरे यांनी ठणकावले. मेट्रो प्रकल्पासाठी एका जर्मन कंपनीकडून ५०० दशलक्ष युरोचे कर्ज अतिशय अल्पदरात प्राप्त झाल्याचेही ते म्हणाले ( Uddhav Thackeray said, German company provided loan for Metro railway ).

राज्य सरकारने हजारो कोटी रूपयांचे सामंजस्य करार केले आहेत. राज्यात नवनवीन उद्योग येत आहेत. परदेशातून येणाऱ्या उद्योजकांना महाराष्ट्रात अधिक सुरक्षित वाटते. राज्यात येत असलेल्या या प्रकल्पांचा, पैशांचा उधळला जाणार नाही. त्याचा फायदा लोकांसाठी होईल, असे ते म्हणाले.

सध्या राज्यात सिनेमागृहे, व्यायामशाला, उपहार गृहे सुरू केले आहेत. महिलांसाठी लोकल सुरू केल्या आहेत. सर्व सामान्य लोकांना लोकल ट्रेन सुरू व्हाव्यात म्हणून केंद्राबरोबर बोलणी सुरू आहेत. रेल्वे मंत्री पियुष गोयल चांगले सहकार्य करीत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पावसाळ्यातील चार महिन्यांच्या काळात अनेक संकटे आली. समुद्री किनाऱ्यावर चर्कीवादळ आले होते. त्यामुळे रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. त्यानंतर अतिवृष्टी, पूर, वादळं येत होती. सतत पाऊस येत होता. जमिनी खरडवून गेल्या आहेत. जमिनीचे थर जाऊन वाळवंटासारखी स्थिती झाली आहे.

या चार महिन्यांत तब्बल ४१ लाख हेक्टर जमीन या पूर व अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहे. राज्याची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. तरीही १० हजार कोटी रूपयांची मदत शेतकऱ्यांसाठी केली आहे. केंद्राकडून ३८ हजार कोटी रूपये येणे बाकी आहे. महापालिका, जिल्हा परिषदा राज्य सरकारकडे पैसे मागत आहे. राज्याने केंद्राकडे पैसे मागितल्यानंतर केंद्र सरकार हात वर करीत आहे.

शेतकरी व नागरिक समजदार आहेत. त्यांना संकट कळलेले आहे. त्यांना अनेकजण डिवचतात. पण डिवचणाऱ्यांच्या प्रयत्नांना ते बळी पडत नाहीत. सरकार संकटात आहे, याची जनतेला जाणीव आहे. मराठा, ओबीसी, धनगर यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, असेही आश्वासन ठाकरे यांनी दिले.

सर्वांनी दिवाळी साजरी करा, पण फटाके वाजवू नका. घरीच फराळांचा आस्वाद घेऊन दिवे लावून दिवाळीचा आनंद घ्या, असे ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी