29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रदादा वक्तव्य मागे घ्या, आमदार कपिल पाटील यांची चंद्रकांत पाटलांकडे मागणी

दादा वक्तव्य मागे घ्या, आमदार कपिल पाटील यांची चंद्रकांत पाटलांकडे मागणी

टीम लय भारी

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील तापमान चांगलंच तापलं आहे. याच वातावरणात चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण राजकीय र्वतुळात (MLA Kapil Patil) चर्चेला उधान आले आहे. चंद्रकांत पाटीलांनी सुप्रिया सुळेची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्यांची आहे. (MLA Kapil Patil demand to Chandrakant Patil)

स्त्री ला घरी बसवण्याचा काळ कधीच संपलेला आहे. असे म्हणत लोकभारतीचे नेते तथा आमदार कपिल पाटील(MLA Kapil Patil) यांनी चंद्रकांत पाटलांवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नसते तर दुर्लक्ष करता आलं असतं. इतकं वाह्यात विधान चंद्रकांत दादा पाटील यांनी करावं हे क्लेशदायक आणि दुःखदायक आहे.

मीडियाला प्रतिक्रिया देताना चंद्रकांत दादांनी उच्चारलेली दोन वाक्य, सहा शब्द अत्यंत आक्षेपार्ह आहेत. “तुम्ही घरी बसा आणि स्वयंपाक करा.” असं चंद्रकांत दादा म्हणाले. हा तर (MLA Kapil Patil) मनुस्मृतीचा मंत्र आहे. ‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति’ सांगून मनुस्मृतीने स्त्रियांना पारतंत्र्यात लोटलं.

स्त्री ला घरी बसवण्याचा काळ कधीच संपलेला आहे. जिजामाता घरी बसल्या असत्या तर शिवाजी महाराज छत्रपती झाले नसते. स्वराज्याची पहाट झाली नसती. अहिल्याबाई होळकर घरी बसल्या असत्या तर लोकमाता झाल्या नसत्या. सावित्रीबाई फुले घरी बसल्या असत्या तर स्त्री शिक्षणाची पहाट झाली नसती. ताराबाई शिंदेंनी स्त्री पुरुष तुलना (MLA Kapil Patil)केली नसती तर स्त्रिया आज बरोबरीने उभ्या राहिल्या नसत्या. या महामानवींचा हा महाराष्ट्र आहे. इथे स्त्री द्वेषाला जागा नाही.

चंद्रकांत दादा पाटील यांनी पुढचं वाक्य आणखीन भयंकर म्हटलं आहे. “दिल्लीत जा,नाहीतर मसणात जा.” केतकी चितळे शरद पवारांच्या मरणाची कामना करते. चंद्रकांत दादा तुम्ही सुप्रियाताईंना मसणात जा सांगता तेव्हा वेगळं काय बोलता आहात? कुणाच्या मरणाची कामना करणे ही कुणाची परंपरा आहे? असा सर्वसामान्य प्रश्न आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित (MLA Kapil Patil) केला आहे.

हे सुद्धा वाचा :- 

Maharashtra BJP President Chandrakant Patil passes sexist remark upon NCP MP Supriya Sule

ओबीसी आरक्षणाबाबत धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक : किशोर मासाळ

बिल्डर व दारू विक्रेत्यांच्या भल्याचा विचार करणारे आघाडी सरकार पोलिसांचा भल्याचा विचार कधी करणार, प्रविण दरेकर यांचा सवाल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी