28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeसिनेमाAditya Thackeray यांनी शाहरूख खानचे मानले आभार

Aditya Thackeray यांनी शाहरूख खानचे मानले आभार

Aditya Thackeray यांनी अन्य कलाकारांनाही दिले धन्यवाद

 

टीम लय भारी

मुंबई : बॉलिवडूचा किंग खान अर्थात शाहरूख खानचे ( Shahrukh Khan ) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray )  यांनी आभार मानले आहेत. ‘कोरोना’बद्दल ( Coronavirus ) जनजागृती करणारा एक व्हिडीओ शाहरूख खानने जारी केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी शाहरूखचे आभार मानले आहेत.

‘लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळायला हवे असे मला वाटते. फार मोठी गरज नसले तर रेल्वे व बसचा प्रवासही टाळायला हवा. पुढील १० ते १५ दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या आपत्तीला निपटवण्यासाठी जनता आणि राज्य सरकारने एकत्रितपणे ठाम उभे राहायला हवे. लोकांनी घाबरू नये, परंतु स्वतःची काळजी घ्यावी. राज्य सरकारने केलल्या सुचना आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.’ – शाहरूख खान

शाहरूखने ट्विट करून हा व्हिडीओ जारी केला आहे. या ट्विटला आदित्य ठाकरे यांनी आभार मानणारे प्रत्युत्तर दिले आहे. ‘धन्यवाद शाहरूखजी. विषाणू विरूद्धच्या ( #WarAgainstVirus)  या युद्धात विजयी होण्यासाठी तुम्ही लोकांना आवाहन केले. सगळ्या नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळायला हवा. घरी थांबा, अन् सुरक्षित राहा’

अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनिल कपूर, शिल्पा शेट्टी, आलिया भट, रणवीर सिंग आदी कलाकारांनी सुद्धा एकत्रित व्हिडीओ जारी केला आहे. त्यात ‘कोरोना’पासून सावध राहण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी याने हा व्हिडीओ तयार केला आहे. या सगळ्या कलाकारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी आभार मानले आहेत. जवळपास 10 ते 12 कलाकारांनी ‘कोरोना’च्या लढाईत सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.

अमोल कोल्हेंचेही योगदान

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे ( Dr. Amol Kolhe ) हे घराघरांत पोहचले आहेत. डॉ. कोल्हे यांनी सुद्धा ‘कोरोना’ची खबरदारी घेण्यासाठी ६ व्हिडीओ संदेश बनविले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाकडून हे संदेश लोकांपर्यंत पोहचवून जनजागृती करण्यात येत आहे. मास्क कसा वापरावा, हात कसे धुवावेत, गर्दी टाळणे कसे गरजेचे आहे इत्यादी मुद्द्यांवर डॉ. कोल्हे यांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन केले आहे.

राज्यात एकूण ५२ रूग्ण

पिंपरी चिंचवड – १२

पुणे – ९

मुंबई – ११

नागपूर – ४

यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण – प्रत्येकी ३

अहमदनगर – २

रायगड, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी – प्रत्येकी १

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरेंची दुपारी घोषणा, संध्याकाळी आदेश जारी

उद्धव ठाकरेंकडे जाण्याअगोदर राजेश टोपेंनी आईंची रूग्णालयात घेतली भेट

Breaking : रेल्वे व बस सेवा सुरूच राहणार; पण मुंबई, पुणे, नागपूर बंद : उद्धव ठाकरे यांची घोषणा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी