29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeसिनेमाBirthday Special: जाणून घ्या सागरिका आणि झहीर खानची लव्हस्टोरी

Birthday Special: जाणून घ्या सागरिका आणि झहीर खानची लव्हस्टोरी

टीम लय भारी

मुंबई: ‘फॉक्स’, ‘मिले ना मिले हम’ या चित्रपटात काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री सागरिका घाटगेचा आज ८ जानेवारी रोजी वाढदिवस आहे. ‘चक दे इंडिया’तील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकाविणारी सागरिकाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज झहीर खानशी लग्न केले.(Find out the love story of Sagarika and Zaheer Khan)

 सागरिका आणि झहीरची ओळख अंगद बेदी आणि इतर काही मित्रांमुळे झाली. त्यानंतर दोघांनी जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केले. मात्र, या दोघांनीही कोणालाच त्यांच्या प्रेमप्रकरणाची कानोकान खबर लागू दिली नाही.

Irrfan Khan Birth Anniversary : इरफान खानचे ‘हे’ चित्रपट आवर्जून पाहाच!

अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण

काही वेबसाइट्सच्या वृत्तानुसार, पहिल्या भेटीत हे दोघंही एकमेकांना पसंत करू लागले होते. दोघांच्या नंतर भेटीगाठी वाढल्या आणि अनेक कार्यक्रमांमध्येही ते एकत्र दिसू लागले. इतकेच नव्हे तर आयपीएल सामन्यांवेळीही सागरिका त्याला पाठिंबा देताना दिसली.

सागरिकाच्या आजी इंदौरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या तृतीय कन्या

युवराज सिंगच्या गोव्यात झालेल्या लग्नापासून जयपूरमधील रिसेप्शनमध्येही सागरिका-झहीर एकत्र दिसले. आपल्या लग्नासाठी घरच्यांची मनधरनी करण्याबद्दल एका मुलाखतीत झहीर म्हणालेला की, मी घरच्यांना सागरिकाबद्दल सांगताच त्यांनी सर्वप्रथम ‘चक दे इंडिया’ ची सीडी मागवली. संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी आमच्या लग्नाला होकार दिला. सागरिकाच्या आजी इंदौरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या तृतीय कन्या.

Happy Birthday A R Rahman | पोटासाठी मिळेल ते काम ते 2 ऑस्कर पटकावणारा ए.आर. रहमानचा थक्क करणारा प्रवास!

Ranbir Kapoor & Alia Bhatt’s Marriage Will Work Only If The Actress Remains Submissive? Astrologer Makes Predictions!

सागरिकाने या चित्रपटातही केले काम

सागरिकाने नोंदणी पद्धतीने झहीरशी लग्न केले. त्यानंतर या जोडप्याने आपल्या मित्रपरिवारासाठी ग्रॅण्ड रिसेप्शन ठेवले होते. शाहरुखसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सागरिकाने ‘फॉक्स’, ‘मिले ना मिले हम’, ‘रश’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याव्यतिरीक्त तिने अतुल कुलकर्णीसोबत ‘प्रेमाची गोष्ट’ या मराठी चित्रपटातही काम केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी