31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeव्हिडीओVIDEO : दीपावलीनिमित्त ‘निथळत्या राती’ गाण्यांचा नजराणा

VIDEO : दीपावलीनिमित्त ‘निथळत्या राती’ गाण्यांचा नजराणा

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : गायिका आनंदी जोशी, संगीतकार शशांक प्रताप पवार, गीतकार साहस साखरे यांच्या  साथीने नव्या सुमधुर गीताची निर्मिती झाली आहे. रोमँटिक असे हे गाणे तुम्हाला सहज ठेका धरायला लावते आणि तेवढीच रोमँटिक दृश्यनिर्मिती केली आहे ‘तुला पहाते रे’ ह्या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत लता गायकवाड यांनी.

संगीप्रेमींना भावणारे आणि तितकेच नयनरम्य चित्र गायकवाड यांनी सहजतेने आपल्या दिग्दर्शक प्रतिभेने उभे केले आहे. या सगळ्याला मोलाची साथ लाभली ती कलाकार मालविका गायकवाड (मुळशी पॅटर्न फेम) आणि संकेत लोंढे यांची. सहज सुंदर अभिनयामुळे हा संगीत सोहळा अजून आपलासा वाटायला लागतो. सोशल मीडियामधील प्रोमो बघूनच याची कल्पना तुम्हाला नक्की येईल. या अल्बमची सर्वात उजवी बाजू म्हणजे हा अल्बम लष्करातील सैनिकांना समर्पित केला आहे. अल्बममध्ये आर्मीमधील एका सैनिकाची  रोमॅंटिक स्टोरी सुंदर पद्धतीने गुंफली आहे. भारतीय लष्कराला समर्पित केलेला हा भारतातील पहिला रोमँटिक अल्बम आहे.

गुहागर, दाभोळ या कोकणातील नयनरम्य परिसरात याचे चित्रीकरण झाले आहे. दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर  25 ऑक्टोबर रोजी हा अल्बम रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एएमई म्युझिक निर्मित असलेला  ‘निथळत्या राती’ म्युझिक अल्बम नक्कीच तुम्हाला भावेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी