25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeसिनेमावाढदिवस विशेष : सुप्रिया - सचिन पिळगांवकर यांची सदाबहार प्रेमकहाणी

वाढदिवस विशेष : सुप्रिया – सचिन पिळगांवकर यांची सदाबहार प्रेमकहाणी

प्राची ओले : टीम लय भारी

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट चिरतरुण जोडी म्हणजे सुप्रिया सचिन पिळगांवकर यांची झकास जोडी ओळखली जाते. ही जोडी जेवढी गोड आहे, तशीच यांची प्रेमकहाणी देखील मजेशीर आहे. या जोडीचा लागोपाठ 16-17 ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो (Supriya – Sachin Pilgaonkar evergreen love story).

अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी बालकलाकार म्हणून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. त्यांचे वडील शरद पिळगांवकर हे निर्माते होते. त्यांनी अष्टविनायक, चोरावर मोर अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे. सचिन यांनी 1975 मध्ये गीत गाता चल, 1976 बालिका वधू, 1978 अखियोंके झरोखोंसे तर, 1982 मध्ये नदियोंके पार अशा हिंदी सिनेमात काम केले.

‘इंडियन आयडॉल 12’ च्या ट्रॉफीवर पवनदीपने मारली बाजी

‘रूप नगर के चीते’ मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई दूरदर्शन वरील किलबिल या लहान मुलांच्या कार्यक्रमात सुप्रिया ह्या सूत्रसंचालक होत्या. त्यांचे माहेरचे नाव सुप्रिया अरुण सबनीस असे होते (His maiden name was Supriya Arun Sabnis).

‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटाच्या वेळी सचिन पिळगांवकर हे अभिनेत्रीच्या शोधात होते. तेव्हा, त्यांच्या आईने त्यांना सुप्रियांचे नाव सुचवले. या चित्रपटात काम करण्यासाठी विचारले गेले असता, सुप्रियांनी होकार द्यायला बराच वेळ घेतला. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सचिन ह्यांना सुप्रियांबद्दल विशेष भावना जाणवू लागल्या. त्याचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. चित्रीकरणादरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली परंतु आपल्या मनातल्या प्रेमाविषयी सुप्रियांपुढे बोलणे त्यांना कठीण जात होते. त्यांनी शेवटी एक दिवस धाडस करून मनातल्या प्रेमाच्या भावना सुप्रियांना सांगून टाकल्या (He finally dared to tell Supriya about his feelings of love).

सुप्रिया हे ऐकून चकित झाल्या, आणि म्हणल्या ‘मला असं वाटलं तुमचं लग्न झालंय..’ तेव्हा सचिन यांनी ते सिंगल असल्याचे सांगितले. त्यांच्या या प्रेमाला होकार द्यायला सुप्रिया यांनी ह्यावेळी देखील बराच वेळ लावला. तेव्हा सुप्रिया ह्या केवळ 16 वर्षाच्या होत्या. सुप्रिया आणि सचिन ह्यांच्या मध्ये 11 वर्षाचे अंतर आहे. शेवटी वय विसरायला लावेल तेच खरं प्रेम.

चाहत्यांच्या प्रेमाखातर अमृता खानविलकर आता यूट्यूबवर

Happy Birthday Sachin Pilgaonkar: Best Marathi movies of actor-director

सुप्रिया यांनी बारावी बोर्डाची पूर्व परीक्षा दिली न्हवती. कॉलेज कडून घरी परीक्षा दिली नसल्याचे पत्र गेले. आणि त्यानंतर सुप्रिया आणि सचिन यांच्या प्रेमाचे बिंग फुटले. त्यांच्या घरच्यांनी परिस्थिती योग्य रित्या शांतपणे हाताळली, एफ. वाय. आर्ट्स मध्ये शिकत असताना त्यांनी लग्नाला होकार दिला. 21 एप्रिल 1985 रोजी साखरपुडा झाला. पुढच्या अवघ्या सहा महिन्यात म्हणजेच 21 डिसेंबर 1985 मध्ये त्यांनी लग्न गाठ बांधली. दादरच्या राजा श्री शिवाजी महाविद्यालयात त्यांचे लग्न झाले (They were married at Raja Shri Shivaji College, Dadar).

लग्नानंतर सुप्रिया यांनी सासूबाई आणि नणंद यांच्या सोबत घर   सांभाळायचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. श्रियाच्या जन्मानंतर त्यांनी एक उत्तम आई म्हणून भूमिका देखील छान पर पाडली आणि पुन्हा एकदा सिनेमात कमबॅक केले. सचिन यांच्या सोबत त्यांनी माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा, आम्ही सातपुते असे गाजलेले चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले. त्यांची मुलगी श्रिया सोबत त्यांनी एकुलती एक एक हा सहकुटुंब चित्रपट केला.

सुप्रिया यांनी एक गोड आणि सुंदर अभिनेत्री म्हणून उत्तम काम केले. ‘तू तू मैं मैं’ या सासू सूनेच्या कार्यक्रमात रीमा लागू यांच्या सोबत लीड रोल केला. तसेच अनेक मराठी नाटक, हिंदी आणि मरठी मालिका, सिनेमा यांमधून त्यांनी काम केले.

Supriya - Sachin Pilgaonkar evergreen love story
सुप्रिया आणि सचिन पिळगांवकर

2006 च्या ‘नच बल्लिये’ या हिंदी पती-पत्नींचा नृत्य स्पर्धा रिॲलिटी शो मध्ये सहभाग घेतला आणि विजेते पद देखील मिळवले. मी सुप्रियाविना अधुरा अपूर्ण आहे. आम्ही दोघेही एकमेकांचा आदर करतो. समजून घेतो आणि म्हणूनच आमच्यातले प्रेम कधीही कमी होणार नाही. असे सचिन पिळगांवकर सांगतात. सचिन पिगांवकर हे सुप्रिया यांना प्रेमाने ‘सुपर’ अशी हाक मारतात (Sachin Pigaonkar affectionately calls Supriya ‘Super’).

अशा या सुपरहिट जोडीने चित्रपट सृष्टीत एक उत्तम पती-पत्नी जोडी म्हणून सर्वांसमोर आदर्श ठेवलाय. एक उत्तम आई वडील म्हणून मुलीला तिच्या करिअर निवडण्याची सुट दिली. तिला नेहमीच एक चांगली व्यक्ती म्हणून त्यांनी वाढवले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी