29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeसिनेमाSushant Singh : सुशांतसिंग... चित्रपट सृष्टीतील वर्ग संघर्षाचा बळी

Sushant Singh : सुशांतसिंग… चित्रपट सृष्टीतील वर्ग संघर्षाचा बळी

सुशांतसिंग… (Sushant Singh) चित्रपट सृष्टीतील वर्ग संघर्षाचा बळी

जात संघर्ष …

भारतामध्ये शतकोनशतके जात संघर्ष चालू आहे . जात नाही ती जात अशी परिस्थिती असताना भारतातील सर्वात मोठा आणि महत्वाचा चित्रपट व्यवसाय यापासून वेगळा कसा असेल?

स्वतःची खरी ओळख का पुसली?

सुरवातीच्या काळात चित्रपट, गायन , वादन, संगीत, ह्या सर्वच क्षेत्रात मुस्लिम समाज आघाडीवर होता . ह्या क्षेत्रावर मुस्लिम समाजाचे अघोषित असे साम्राज्य होते . असे असून सुद्धा युसुफखान ह्याने दिलीपकुमार, बेगम मुमताज जहाँ हिने मधुबाला , मेहजबिन बानो हिने मीनाकुमारी अशी आपली नावे धारण करून ह्या व्यवसायात काम केले . असा कोणता सामाजिक दबाव होता त्या काळी की त्यांना आपली स्वतःची खरी ओळख पुसावी लागली ?

फॅन म्हणजे फॅन …

त्या काळात आजच्या सारखा कट्टर आणि इतका पराकोटीचा जातीयवाद, गर्व , अभिमान वगैरे नव्हता . प्रेक्षक कलाकारांवर भरभरून प्रचंड प्रेम करायचा . कलाकार कोणत्या जातीचा , धर्माचा, प्रांताचा आहे हे त्याला माहीत सुद्धा नसायचे . फॅन म्हणजे फॅन . बाकी गेलं उडत .

राम तेरी गंगा मैली ….

मध्यंतरी खानांच साम्राज्य तयार झालं . आता हे साम्राज्य कसं तयार झालं ? कोणी तयार केलं ? का तयार केलं ? दुसर्यांना जाणीवपूर्वक का धमकविण्यात आलं ? सह कलाकाराचं आयुष्य का उध्वस्त केली गेली ? ह्यामध्ये दाऊदचा काही हात होता का ? अशी असंख्य प्रश्नांची मालिका तयार झाली . काही प्रश्नांची उत्तरे मिळाली . काहींची तशीच अनुत्तरीत राहिली आणि पुढे पुढे त्या प्रश्नांची अक्राळविक्राळ स्वरूपात उत्तरे मिळू लागली . पूर्वीची चित्रपट सृष्टी आता गँगस्टरची सृष्टी झाली होती . पूर्वीची पवित्र गंगा असलेली चित्रपटसृष्टी कधी मैली झाली हे सर्व सामान्य प्रेक्षकांना समजले सुद्धा नाही .

चित्रपट सृष्टी गुन्हेगारांचा अड्डा ….

भारतीय चित्रपटसृष्टी ही गुन्हेगारांचा अड्डा झाली . मोठमोठ्या गुन्हेगारी लोकांना आम्ही हिरो , निर्माता म्हणून डोक्यावर घेऊ लागलो . आम्ही प्रेक्षक इतके निष्पापपणे ( खरं तर बिनडोकपणे ) ह्या अड्ड्याकडे पाहत राहिलो . जसं काही आमचे ह्यांच्याशी काहीच देणे घेणे नाही . आम्ही जर त्याच वेळी ह्या गुन्हेगारांवर बहिष्कार घातला असता तर हे क्षेत्र आज बऱ्यापैकी सुधारले असते . परंतु आमच्या मुर्खपणामुळे ह्या गुंडाचं फावलं आणि ते वाटेल तसे उधळू लागले .

संजय दत्त …..

संजय दत्त बॉम्बस्फोट खटल्यात आरोपी म्हणून तुरुंगात शिक्षा भोगून आल्यावर सुद्धा त्याला तोच मानमरताब मिळतोय .

सलमान खान ….

सलमान खान दोन दोन तीन तीन प्रकरणात आरोपी असून सुद्धा त्याचे चित्रपट सुपर डूपर हिट होत आहेत .

आम्हाला कधी घृणा वाटणार आहे की नाही ?….

प्रश्न असा आहे की , आम्हाला ह्या क्षेत्रातील अस्सल गुन्हेगारांबद्दल कधी घृणा वाटणार आहे की नाही ? आम्ही ह्या क्षेत्राला कधी गंभीरपणे घेणार आहोत की नाही ? का हिरो सारखाच थिल्लरपणा आम्ही सुद्धा करणार आहोत ? संजय दत्त सारख्या आरोपीवर निघालेला चित्रपट हाऊसफुल्ल ? काय अभिनय केलाय रणबिर कपूरने असे म्हणून आम्ही आमचा आय क्यू इतका खालच्या दर्जाचा आहे हे दाखवून देतोय का ? त्या चित्रपटातील एक डायलॉग संपूर्ण स्त्री जातीचा अपमान करणारा आहे (वेश्या सोडून मी ३५० स्त्रियांबरोबर झोपलो आहे असेच काहीतरी …) परंतु आमच्या स्त्रियासुद्धा त्यांचा स्वाभिमान गहाण ठेऊन नटापट्टा करून त्याचा चित्रपट पहावयास जात होते . असो .

*चित्रपट क्षेत्रातील राजकीय लोचटगीरी…*

प्रत्येक काळात सत्ताधारी पक्षाची लोचटगीरी करणारी चित्रपटसृष्टी ह्यावेळी सुद्धा प्रस्थापितांच्या आहारी नेहमीप्रमाणे गेली . जो कोणी सरकार विरोधात बोलेल त्याच्यावर बहिष्कार टाकणे , त्याला बदनाम करणे असे उद्योग ही मंडळी करू लागली . दीपिका पदुकोण जे एन यु विद्यापीठात विद्यार्थ्यांना फक्त भेटायला गेली तर तिच्याविरोधात किती ट्रोल ? अनुपम खेर सारखा सामान्य कुवतीचा कलाकार त्याच्या लायकीपेक्षा कितीतरी जास्त बोलायला लागला .

*अक्षयकुमार …..*

अक्षयकुमार सारखा तिसऱ्या श्रेणीचा कलाकार सरकारी जाहिरातीचे चित्रपट करायला लागला . त्यासाठी त्याने प्रचंड पैसा कमावला आणि त्यातील काही मलिदा दान स्वरूपात वाटून पुन्हा समाजात मिरवायला मोकळा झाला . इतका की प्रधानमंत्र्यांची ऐन निवडणुकीच्या काळातील अराजकीय मुलाखत ( हा शब्दप्रयोग पहिल्यांदा आम्हाला समजला नंतर तो निवडणूक आयोगाने सुद्धा समजून मान्य करून घेतला ) अक्षयकुमारने घेतली .

*आमच्या सामाजिक बांधिलकीच काय ……*

एकवेळ हे सारं परवडेल परंतु चित्रपट सृष्टीत जो वर्ग संघर्ष सध्या मोठ्या प्रमाणात फोफावतोय त्याकडे आम्ही गंभीररीत्या पाहणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे . त्यामध्ये आमची काही सामाजिक बांधिलकी आहे की नाही ?

*सर्वसामान्य घरातील मुलं प्रस्थापितांसाठी गुलाम….*

जे सर्वसामान्य घरातून येऊन आपल्या टॅलेंटवर ह्या क्षेत्रात येत आहेत त्यांना हे प्रस्थापित गुलाम समजत आहेत . तसे वागवीत आहेत . आमच्या अटी शर्थी प्रमाणे तुम्ही वागला नाहीत तर आम्ही तुमचे करियर संपवून टाकू. त्याला चित्रपटात काम देणार नाही , दुसरा कोणी देत असेल तर त्याला सुद्धा टार्गेट करू जेणेकरून तो त्याच्या चित्रपटातून तुम्हाला काढून टाकेल .

*सेलिब्रिटींची मुले …..*

ज्यांचे आई वडील , नातेवाईक अगोदरपासूनच ह्या व्यवसायात आहेत त्यांचीच पिढी ह्या क्षेत्रात पुढे येईल अशी यंत्रणा जाणीवपूर्वक तयार करण्यात येत आहे . ह्या पिढीसाठी सगळी स्क्रिप्ट अगोदरच तयार करून ठेवली जाते . किती खायचे , किती मेकअप करायचा , कोणत्या मासिकाच्या पत्रकाराला मुलाखत द्यायची हे सर्व ठरवून केले जात आहे . ह्या गँगच्या बाहेरच्या व्यक्तीने आत येण्याचा प्रयत्न केलाच तर ही गिधाडे त्याच्यावर किंवा तिच्यावर तुटून पडायला मोकळे .

*सुशांतसिंग च्या बाबतीत हेच सर्व झाले .*

*सुशांतसिंग एक अत्यंत गुणी मुलगा ….*

सर्वसाधारण कुटुंबातून आलेला हा मुलगा . अतिशय बुद्धिमान , देखणा , नम्र , हिरोसाठी आवश्यक असलेले सर्व गुण असलेला , खगोलशास्त्र ह्या किचकट विषयात प्राविण्य मिळवलेला , चंद्रावर जागा विकत घेणारा , हसतमुख , वैचारिक बैठक असलेला , छोट्या पडद्यावरून सुरुवात करून हळूहळू मोठा होत चाललेला . भविष्यातील सुपरस्टार पदावर दावा ठोकणारा . आता काही वर्षातच सगळी गणितं बदलणार होता आणि हे जेव्हा ह्या प्रस्थापितांच्या लक्षात यायला लागले तेव्हा मात्र ह्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली . मग ह्यांनी त्यांचे कुटील डाव टाकण्यास सुरुवात केली . त्याला मिळणारे चित्रपट काढून घेणे . त्याला कोणत्याही चित्रपटाच्या पार्टीला न बोलाविणे . त्याची बदनामी करणे . तो वेडा आहे, घमेंडखोर आहे , तो ड्रग्स घेतो असे मार्केटमध्ये जाणीवपूर्वक वातावरण तयार केले गेले .

*फिल्मी गॅंग …..*

सुशांतसिंगला कोणीही पार्टीमध्ये बोलावित नसे . धर्मा प्रोडक्शन साजिद नाडीयादवाला, टी सिरीज, सलमान खान , दिनेश विजियन , बालाजी प्रोडक्शन ह्या व्यक्ती आणि संस्थांनी तर त्याला उघड उघड बॅन केले . एकप्रकारे त्याला मानसिक त्रास देऊन ही गॅंग त्याला संपविण्याचा डाव आखत होती . त्याचे चित्रपट काढून घेऊन ते रणवीर सिंग ला देण्यात येत होते .

*फिल्मी दुनियेकडून मानसिक त्रास ….*

त्याला एकही अवार्ड मिळणार नाही ह्याची पुरेशी काळजी घेण्यात येत होती . त्याला कोणीही गॉड फादर नव्हता . एकटा होता बिचारा तो . चित्रपट सृष्टीत असलेल्या “खानदाना ” मधून कोणी जरी चिरकूट चित्रपट क्षेत्रात आले तर त्याला/ तिला आल्याआल्या अवॉर्ड दिले जाते . सुशांत ह्या क्षेत्रात येउन ७-८ वर्षे झाली तरीसुद्धा त्याला मात्र कोणतेच अवॉर्ड दिले गेले नाही . कोण खचणार नाही अशा वातावरणात ? आणि हो तेवढी लायकी सिद्ध केल्यावर सुद्धा !!

*करण जोहर गॅंग , मूवी माफिया …..*

करण जोहर गे ह्या गँगचा गब्बरसिंग , मूवी माफिया . ‘ कॉफी ‘ सारख्या अतिशय भंगार कार्यक्रमात तो सुशांतसिंगचा अपमान होईल अशी वारंवार कमेंट पास करायचा . कारण करण जोहरच्या काही चित्रपटात सुशांतसिंगने काम करण्यास नकार दिला होता म्हणून . म्हणून त्याचा मानसिक छळ करण्याचा जोहरला कायदेशीर हक्कच प्राप्त झाला होता .

*चित्रपट सृष्टीतील दहशत ….*

सलमान खान , शाहरुख खान , करण जोहर ह्यांची चित्रपट सृष्टीत इतकी दहशत आहे की त्यांनी फक्त डोळे वटारले तरी भल्याभल्याची चड्डी पिवळी होते . इतका भयानक दरारा आहे ह्यांचा .

*पोलिसांनी सखोल तपास करावा ….*

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण हे वाटते तितके सरळ प्रकरण नाही . आमची मुंबई पोलीस आयुक्त साहेबांना कळकळीची विनंती आहे की , ह्या प्रकरणाच्या मुळाशी तुम्ही जा. सखोल तपास करा . वर नमूद संस्था , व्यक्ती ह्यांना किमान जबाब देण्यासाठी का होईना पोलीस स्टेशनला बोलवा .

*हरामखोरांना पोलीस ठाण्यात बोलवा …..*

आत्महत्या हा खून आहे हे सिद्ध करणे अवघड आहे . कारण मानसिक त्रास दिला हे कायद्याने सिद्ध करणे थोडेसे अवघड असते . परंतु किमान त्यांना पोलीस स्टेशनला बोलवा . त्यांच्यावर तेवढीच जरब बसेल . नाहीतर हे माजुरडे सांड असेच गरिबांच्या मुलांचा छळ करून खून करीत बसतील . ह्या गँगची , हरामखोरांची मस्ती आणि माज उतरविल्याशिवाय चित्रपटसृष्टी साफ होणार नाही .

*निल नितीन मुकेश …..*

काही दिवसांपूर्वी निल नितीन मुकेश ह्या गुणी तरुण अभिनेत्याचा आयफा ह्या फडतूस कार्यक्रमात शाहरुख खान आणि सैफअली खानने सर्वांसमोर अपमान केला . त्यावर निल नितीन मुकेश ने त्या खान भाईना तिथेच उत्तर दिले . त्याचा त्या दोघांना इतका राग आला की त्यानंतर निल नितीन मुकेश हा एकाही मोठ्या चित्रपटात दिसेनासा झाला . हा आहे ह्यांचा अदृष्य हात .

*शाहरुख मियाँ हे बरं नव्ह …*

शाहरुख सारख्या गरिबीतून आणि छोट्या पडद्यावरून मोठ्या झालेल्या व्यक्तीला सुद्धा इतका माज यावा ? विसरलास का बेट्या ते जुने दिवस . मुलाखतीत मोठमोठे , उद्दात विचार मांडायचे , मिस वर्ल्ड साठी घोकून घोकून पाठ केलेली उत्तरे जशी देतात तशी उत्तरे द्यायची आणि प्रत्यक्षात खुनशी स्वभाव ठेवायचा . हे बरं नव्हे मियाँ .

*वर्ग संघर्षाविरोधात लढा उभारणे गरजेचे …..*

आम्ही जात संघर्ष ह्यावरच जास्त विचार करतो . लढा उभारतो . ते १००% योग्य सुद्धा आहे . परंतु आम्ही ह्या चित्रपट सृष्टीतील वर्ग संघर्षाविरुद्ध जोपर्यंत खंबीरपणे उभे राहणार नाही तोपर्यंत असे करण जोहर, खान प्रवृत्तीचे अत्याचार वाढतच जाणार .

आमच्या गरीब , सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींचे टॅलेंट असेच सडणार , मरणार . आणि ह्या प्रस्थापितांच्या पिढ्या न पिढ्या आमच्यावर राज्य करून करोडो रुपये कमवित राहणार .

*आमची जबाबदारी , कर्तव्य मोठे ….*

आमच्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर चित्रपट सृष्टीचा फार मोठा परिणाम होत असतो .त्यामुळेच आमची मोठी जबाबदारी आणि कर्तव्य सुद्धा आहे .

*प्रस्थापितांच्या चित्रपटांवर बंदी घाला ….*

ह्यावर उपाय एकच . एकाही प्रस्थापिताच्या मुलामुलींचे चित्रपट पाहू नका . बंद करा ह्यांचे खानदानी उद्योग . सुशांतसिंगला जर खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर आम्हाला अशा वर नमूद प्रस्थापितांच्या चित्रपटांवर बॅन केले पाहिजे . एखाद्या गरीब , सर्वसाधारण कुटुंबातील मुलामुलीचेच चित्रपट पाहण्यास आम्हाला पसंती द्यावी लागेल .

*आता ह्यांना डोक्यावर घेऊ नका ….*

आता आम्ही किती दिवस बच्चन खानदान, खान खानदान, कपूर खानदान, आणि इतर अशीच खानदाने आमच्या डोक्यावर घेऊन नाचायची ? आता आम्हाला सुद्धा वेगळा विचार करायला नको का ? क्रांती वगैरे का काय ते ह्यालाच म्हणतात ना ?

*चित्रपटात राजकारणी की राजकारणी चित्रपट ….*

आता हळूहळू राजकारणात सुद्धा हीच मंडळी शिरू लागलीत . हेमा मालिनी खासदार झाल्यावर हळूच त्यांनी त्यांचे पती धर्मेंद्र ह्यांना खासदार केले . त्यानंतर सावत्र मुलगा सनी ह्याला सुद्धा खासदार केले . म्हणजे एका घरात तीन तीन खासदार . आमचे साधे ग्राम पंचायतीमध्ये सभासद म्हणून निवडून येण्यास संपूर्ण आयुष्य निघून जाते . अमिताभ बच्चन साहेबांनी राजीव गांधींच्या मेहेरबाणीवर खासदारकी मिळविली . राजीवजी गेल्यानंतर हळूच मुलायम सिंगांच्या मेहेरबाणीवर पत्नी जया ह्यांना खासदारकी . काय चाललंय काय ? अशी अनेक उदाहरणे आहेत .

*अदृश्य आणि नव्या झुंडीकडे लक्ष दिले पाहिजे ….*

आम्हाला आता सतत लिहावे आणि बोलावेच लागेल . आम्ही जसे खऱ्या राजकारणी लोकांवर नजर ठेवून असतो त्यापेक्षाही करडी नजर ह्या नाच गाणे करणाऱ्या ” राजकारण्यांवर ” ठेवावी लागेल . आम्ही आमच्या रोजच्या रहाटगाडग्यात इतके खचून गेलोय की ह्या अदृश्य आणि नव्या झुंडीकडे आमचे लक्षच जात नाही .

*सामाजिक भान असलेला सुशांतसिंग ….*

सुशांतसिंग सारखा हुशार आणि खऱ्या अर्थाने सामाजिक भान असलेल्या अभिनेत्याला न्याय मिळालाच पाहिजे . सन २०१८ आणि २०१९ मध्ये केरळ राज्यात आलेल्या पुराच्या वेळी अनुक्रमे एक करोड आणि एक करोड पंचवीस लाख रुपये आणि नागालँड राज्यात २०१८ मध्ये आलेल्या पूरग्रस्तांना एक कोटी पंचवीस लाख रुपये देऊन मदत करणाऱ्या सुशांतसिंगच्या प्रती आमची भारतीय म्हणून काहीच जबाबदारी नाही का ?

*कानून के हाथ …*

सुशांतसिंग तुझी आत्महत्या व्यर्थ जाणार नाही . तुला छळून आणि प्रचंड मानसिक त्रास देणाऱ्या गँगला जोपर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत लढा द्यावाच लागेल . कानून के हाथ बहोत लंबे होते है मेरे दोस्त .

*अंत्यविधीला कोण कोण …..*

आणि हो , सुशांतसिंगच्या अंत्यविधीला श्रद्धा कपूर , क्रीती सैनॉन ह्या अभिनेत्री आणि विवेक ओबेराय, राजकुमार राव हे अभिनेते सोडल्यास चित्रपट सृष्टीतील कोणीही तथाकथित जेष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार कोरोना महोत्सवाचे कारण देऊन हजर राहिला नाही . हीच का ह्यांची व्यावसायिक परंपरा ?

*आत्महत्या उपाय नाहीच …..*

सुशांत मित्रा , आत्महत्या हे दुःख संपविण्याचा उपाय होऊच शकत नाही , तर ते तुझे दुःख तू तुझ्या चाहत्यांना ट्रान्सफर करीत असतोस .

ठीक आहे . तू तुझा मार्ग निवडलास . काळजी घे .

*तुझा …….,*

*ऍड. विश्वास काश्यप ,*
*मुंबई **

*ताजा कलम….वरील सर्व बाबी ह्या मराठी चित्रपट सृष्टीला सुद्धा तंतोतंत लागू होतात याची जाणकार व्यक्तींनी कृपया नोंद घ्यावी .*

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी