30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeटॉप न्यूजगुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो, ‘महाराष्ट्र धर्म पाळा’; आव्हाड संतापले!

गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो, ‘महाराष्ट्र धर्म पाळा’; आव्हाड संतापले!

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या आकडेवारी लपवण्यात आली असा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यांनंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले.  आव्हाड यांनी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील करोनाच्या मृत्यूदराचा हवाला देत ‘महाराष्ट्र धर्म पाळा’, असा टोला लगावला आहे.

राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणात सुधारणा होत आहे. जवळपास ५६ हजाराच्यावर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ५० हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सरकारकडून करोनाचा प्रसार रोखण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यासाठी कोरोना रुग्णांवरून टीका सुरु आहे. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे.

 

आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. “कोविड-१९ मृत्यूदर, गुजरात : ६.२५, महाराष्ट्र ३.७३ महाराष्ट्रात राहुन गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो, जरा गुजरातमध्ये जाऊन त्यांना ‘महाराष्ट्र पॅटर्न’ काय आहे तो दाखवून खरा महाराष्ट्रधर्म पाळा,” असा टोला आव्हाड यांनी विरोधकांना लगावला.

दोन दिवसापूर्वी काय म्हणाले होते आव्हाड…

कोरोना बाधित आकडेवारीवरून यापूर्वीही आव्हाड यांनी विरोधकांवर  निशाणा साधला होता. “महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा १ लाखाचा आकडा आवर्जून सांगतात. पण त्यातील ५० हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत, हे सांगायचं आवर्जून टाळतात. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे”, अशी टीका आव्हाड यांनी केली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी