35 C
Mumbai
Monday, May 13, 2024
HomeसिनेमाVidya Balan : मध्य प्रदेशच्या मंत्र्याच्या ‘डीनर’ला विद्या बालनने दिला नकार तर...

Vidya Balan : मध्य प्रदेशच्या मंत्र्याच्या ‘डीनर’ला विद्या बालनने दिला नकार तर मंत्र्याने चक्क शूटिंगच थांबवले

टीम लय भारी

भोपाळ : अभिनेत्री विद्या बालनच्या (Vidya Balan) शेरनी चित्रपटाचे चित्रीकरण मंत्री विजय शाह यांच्या इशा-यानंतर थांबवण्यात आले. विजय शाह (Vijay Shah) यांचे जेवणाचे आमत्रंण नाकारल्यामुळे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. (Shooting of a film starring Bollywood actress Vidya Balan was allegedly stopped in Madhya Pradesh after she turned down a state minister’s dinner invitation.)

मात्र, उच्च अधिका-यांपर्यंत प्रकरण पोहचल्यानंतर पुन्हा चित्रीकरण सुरू झाले. यावरून काँग्रेस नेत्यांनी भाजपावर टीका केली असून मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी विद्या बालन यांची माफी मागावी, असे म्हटलं आहे.

विद्या बालनच्या शेरनी चित्रपटाचे चित्रीकरण बालाघाटमध्ये सुरू होते. त्यासाठी 20 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबरपर्यंत परवानगी घेतली होती. याचदरम्यान विजय शाह यांनी विद्या बालन यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी 8 नोव्हेंबरला सकाळी 11 ते 12 दरम्याची वेळ ठरली होती. त्यानंतर शाह यांना चार वाजता महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जायचे होते. मात्र, सायंकाळपर्यंत त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे ते भरवेली खदानच्या विश्रामगृहात थांबले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता ते विद्या बालनची भेट घेण्यासाठी पोहचले. भेटीनंतर त्यांनी रात्रीचे जेवण सोबत करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, विद्या बालन यांनी नकार दिला. त्यानंतर दुस-या दिवशी चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या स्टाफच्या गाड्या डीएफओवेने अडवल्या. मात्र, उच्च अधिका-यांपर्यंत प्रकरण पोहचल्यानंतर पुन्हा चित्रीकरण सुरू झाले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी विद्या बालनची माफी मागावी या प्रकरणावरून काँग्रेसने भाजपवर टीका केली. राज्यातील मंत्र्यांना संयम बाळगायला सांगा आणि राज्याची लाज राखा, असे काँग्रेसने म्हटलं. राज्याच्या जनतेकडून मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी विद्या बालनची माफी मागावी. तसेच भविष्यात असे काही घडणार नाही, हे सुनिश्चित करावे, असे काँग्रेसने म्हटलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी