28 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeमहाराष्ट्रसंतापजनक : ठाण्यात बापाचा अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

संतापजनक : ठाण्यात बापाचा अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

लयभारी न्यूज नेटवर्क

ठाणे : बापाने आपल्या पोटच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील बदलापूर परिसरात शुक्रवारी घडली. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सख्या बापाने आपल्याच मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. ही माहिती कळताच पत्नीने स्थानिक पोलिसात जाऊन आपल्या पती विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे परिसरात आपल्या पित्यानेच पोटच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

पीडित घरात एकटाच असल्याचे पाहून आरोपीने ६ जानेवारी रोजी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. आपली आई घरी परतल्यानंतर पीडितने सर्व प्रकार तिच्या कानावर टाकला. त्यानंतर पीडितच्या आईने आपल्या पतीकडे यासंदर्भात विचारणा केली. दरम्यान, पीडितच्या आई-वडिल यांच्यात भांडण झाले. यानंतर पीडतच्या आईने स्थानिक पोलिसात धाव घेऊन आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. त्यावेळी आरोपीने पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जानेवारी रोजी ही घटना घडली तेव्हा संबंधित मुलाची आई घरात नव्हती. सध्या आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीवर कलम ३७७ तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वीच कोपरीमध्येही अनैसर्गिक अत्याचाराची घटना…..

कोपरी गावातील १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाने त्याच भागातील ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणातील अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात केली आहे. या प्रकरणातील पीडित ११ वर्षीय मुलगा हा वाशीलगतच्या कोपरी गावात आईवडील व मोठ्या भावासह राहतो. त्याच्यावर लैंगिक अत्याचार करणारा १७ वर्षीय अल्पवयीन तरुण हा त्याच परिसरात राहतो.

या घटनेतील पीडित मुलगा हा खासगी शिकवणीतून घरी परतत होता. शिकवणीतून लवकर सुटल्याने तो १०.३० वाजण्याच्या सुमारास कोपरी गावालतच्या गावदेवी मैदानात भरलेल्या जत्रेच्या ठिकाणी गेला होता. त्याठिकाणी त्याला भेटलेल्या तरुणाने त्याला त्याच्यासोबत येण्यास सांगितले, मात्र पीडित मुलाने त्याला नकार देऊन त्याठिकाणावरून पळ काढला. त्यामुळे आरोपी तरुणाने त्याचा पाठलाग करून त्याला पकडून तोंड दाबून त्याला त्या भागात असलेल्या सार्वजनिक शौचालयात नेले. त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी