29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeटॉप न्यूजमध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा दरम्यान ७२ तासांचा जम्बो मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा दरम्यान ७२ तासांचा जम्बो मेगाब्लॉक

टीम लय भारी
मुंबई:- मध्य रेल्वे ५, ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यान ७२ तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेणार आहे.  मेगाब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या शंभरहून अधिक एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय ३५० लोकल ट्रेन या दिवशी धावणार नाहीत.( 72 hours jumbo megablock between Thane Central Railway)

मध्य रेल्वेवर ७२ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक ५, ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी असेल. या मेगा ब्लॉक दरम्यान,

हे सुद्धा वाचा

Central Railway Recruitment 2022: फक्त मुलाखत देऊन रेल्वेत नोकरी मिळवा

Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेतील भरतीसाठी आजपासून नोंदणी, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

रविवारी 24 तासांचा मेगा ब्लॉक, ठाणे-दिवा मार्गावरील वाहतुकीवर होणार परिणाम,लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द

Mumbai: Western and Central Railway proposes to electrify 1,276 route km in this financial year

शंभर पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ३५० लोकल ट्रेन देखील या दिवशी धावणार नाहीत.

ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान ५ व्या लाईनवर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप फास्ट लाईन आणि ६ व्या लाईनवर हा जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या ३ दिवस बंद राहणार आहेत.

कोकणात जाणाऱ्या तेजस, जन शताब्दी, एसी डबल डेकर, तसेच कोच्चूवेली, मंगलोर, हुबळी या एक्सप्रेस गाड्या या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. याबरोबरच डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, जालना जन शताब्दी, कोयना एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेसह शंभर एक्सप्रेस गाड्या तीन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.

दिवा-वसई मेमु ट्रेन रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या पनवेल स्थानकात थांबवण्यात येणार आहेत. तर सर्व फास्ट लोकल गाड्या स्लो ट्रॅकवर डायव्हर्ट केल्या जाणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी