35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeटॉप न्यूजआझाद मैदानावर उद्यापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

आझाद मैदानावर उद्यापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

रविंद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल, मराठी ऍप, अंगणवाड्यांच्या भाड्यात वाढ, आहाराच्या दरात वाढ इत्यादी मागण्यांसाठी मुंबई, ठाणे, पालघर रायगड इत्यादी जवळच्या जिल्ह्यांमधील अंगणवाडी कर्मचारी आजपासून तीन दिवस आझाद मैदान, मुंबई येथे तीव्र धरणे आंदोलन करणार आहेत(Anganwadi workers protest at Azad Maidan from Thursday).

या आंदोलनात मुंबई व ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी रोज २०० च्या संख्येने सहभागी होतील. या आंदोलनात कृती समितीचे सर्व प्रमुख नेते सहभागी होतील. २८ फेब्रुवारी ते ७ मार्च – प्रकल्प, जिल्हा पातळीवर तीव्र निषेध निदर्शने करणार आहेत.

आझाद मैदानावरील धरणे आंदोलनाच्या वेळी शिष्टमंडळाला निमंत्रित करून सकारात्मक चर्चा न झाल्यास अंगणवाडी कर्मचारी प्रकल्प, जिल्हा परिषद, विभागीय उपायुक्त कार्यालये आदी ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहेत. ज्यामध्ये राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होतील.

९ मार्च २०२२ – आझाद मैदान मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे.

विधानसभेचे बजेट सत्र सुरू असल्याने आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात येईल. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो अंगणवाडी कर्मचारी सामील होतील. २८,२९ मार्च २०२२ – दोन तर दिवसीय देशव्यापी सार्वत्रिक संयुक्त संप पुकारण्यात येणार आहे.

देशातील कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने मोदी सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात हा संप पुकारला आहे. संयुक्त किसान मंचाने त्याला पाठिंबा दिला आहे.

हे सुद्धा वाचा 

भटक्या विमुक्त कंत्राटदाराचे बिल थकवले, सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात कंत्राटदाराचे उपोषण

संपामुळे झालेले नुकसान कामगारांना वसूल करावे लागणार, असा महामंडळाचा कोणताच कट नाही

Anganwadi workers to begin 3-day protest tomorrow over wages, pension

केंद्रीय बजेटमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी, महागाई शिगेला पोहोचली आहे. सर्व सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण केले जात आहे. बडे व्यावसायिक मोदींच्या छत्रछायेखाली आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचे बँकेत ठेवलेले कोट्यवधी रुपये बुडवून पळून जात आहेत. शिवाय शेतकरी आणि कामगार यांच्या विरोधात कायदे केले जात आहेत. त्यांच्या विरोधातील धोरणे राबवली जात आहेत.

याविरोधात हा संप होणार असून सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एक दिवस जिल्हा, तालुका पातळीवरील संयुक्त आंदोलनात सहभागी व्हावे व एक दिवस स्थानिक पातळीवर आंदोलन करावे, अशी हाक अंगणवाडी कृती समितीने दिली आहे. या आंदोलनात कामगार नेते एम. ए. पाटील व शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख,सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी