33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमुंबईराज्यात 500 ठिकाणी आपला दवाखाना सेवेत येणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात 500 ठिकाणी आपला दवाखाना सेवेत येणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी राज्यात अनेक ठिकाणी आरोग्यविषयक कामे पार पडली. वाढदिसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (Aapla Dawakhana) या योजनेच्या विस्ताराची घोषणा केली आहे. या विस्तारात 500 दवाखाने सुरू करणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. (Aapla Dawakhana will come at 500 places in the state: CM Eknath Shinde)

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसनिमित्त 366 ठिकाणी रक्तदान शिबीर तर 1800 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीचे जागरुक पालक, सुदृढ बालक अभियान असा आरोग्याचा महायज्ञ पार पडला. राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेतल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी केंद्र सरकारने राज्यातील रेल्वेचे प्रकल्प, नगर विकास विभागाचे विविध प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुंबई शहराला आणखी विकसित करण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशीष शेलार, भरत गोगावले आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

दरम्यान, काल झालेल्या 458 रक्तदान शिबीरात सुमारे 7 हजार 200 रक्त पिशव्यांचे संकलन झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली. त्याचप्रमाणे राज्यभरात 1 हजार 835 आरोग्य शिबीरात 2 लाख 12 हजार 505 रुग्णांची तपासणी करण्यात आली. जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानात सुमारे साडेतीन लाख बालकांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती सावंत यांनी दिली. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील आपला दवाखान्याचे प्रातिनिधिक स्वरुपात उदघाटन करण्यात आले आहे. यावेळी आयुक्त धीरजकुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. स्वप्नील लाळे, उपसंचालक डॉ.विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ विजय बाविस्कर, उपसंचालक कैलास बाविस्कर आदी उपस्थित होते.

वाढदिवस उत्साहात साजरा

Imageएकनाथ शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच वाढदिवस होता. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ठाण्यातील निवासस्थानी आपल्या हजारो चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मतदारसंघात किसननगर येथे दिव्यांग मुलांसोबतदेखील वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्हा, मुंबईसह विविध ठिकाणी शुभेच्छा देणारे पोस्टर, बॅनर लावण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाची ठाण्यात, राज्यात, सोशल मीडियावर धूम!

हार-तुऱ्यांऐवजी तुम्ही मला जनतेची आरोग्यदायी भेट दिली; एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंताचे केले जाहीर कौतुक !

राष्ट्रपतींनी केला एकनाथ शिंदेंना फोन!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी