34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर; वंदे भारत एक्सप्रेसचे करणार लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर; वंदे भारत एक्सप्रेसचे करणार लोकार्पण

मुंबईत विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून मुंबईत भाजपची सत्ता मिळविण्याचा निर्धार केलेल्या पक्षाने देखील यावेळी वातावरण निर्मिती करण्यावर भर दिला आहे. या भेटीत मोदी दोन वंदे भारत गाडय़ांना हिरवा झेंडा दाखविणार आहेत. त्याचप्रमाणे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सैफी अकादमीच्या अंधेरी पूर्व येथील संकुलाचे उद्घाटन करणार आहेत. (Prime Minister Narendra Modi Launching Vande Bharat Express)

देशात एकाच वेळी दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यातील एक ट्रेन मुंबई ते साईनगर शिर्डी आणि दुसरी सोलापूर अशी चालवली जात आहे. एकाच वेळी दोन वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 16 डब्यांच्या या गाड्यांमध्ये 1,128 प्रवासी प्रवास करू शकतात. महाराष्ट्रात दोन वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. एक ट्रेन मुंबई ते अहमदाबाद आणि दुसरी नागपूर ते विलासपूर अशी आहे. वंदे भारत 200 किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे. मात्र रेल्वे बोर्डाने त्यांना सध्या 160 किमी प्रतितास वेगाने धावण्याची परवानगी दिली आहे. या प्रत्येक ट्रेनची किंमत 110 कोटी रुपये आहे. सध्या देशात आठ वंदे भारत ट्रेन धावत आहेत.

मोदी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) येथून या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. दोन्ही गाड्या आठवड्यातून सहा दिवस धावतील. सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवारी धावणार नाही. नियमित धावणारी ही गाडी सीएसएमटी, मुंबई येथून सकाळी 06.20 वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डीला रात्री 11.40 वाजता पोहोचेल. परतीच्या दिशेने ती साईनगर शिर्डी येथून 5.25 वाजता सुटेल आणि 10.50 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. सध्या सीएसएमटी ते साईनगर शिर्डी दरम्यान कोणतीही थेट ट्रेन नाही. दादर ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या ट्रेनला सहा तास लागतात. वंदे भारत एक्सप्रेस हे अंतर पाच तास 25 मिनिटांत पूर्ण करेल. ही ट्रेन सीएसएमटी ते कसारा दरम्यान ताशी 105 किमी आणि इगतपुरी ते पुणतांबा दरम्यान 110 किमी प्रतितास वेगाने धावेल. त्याचा वेग कसारा ते इगतपुरी दरम्यान ताशी 55 किमी आणि पुणतांबा ते साईनगर शिर्डी दरम्यान 75 किमी प्रतितास असेल. मार्गात दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबेल. त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डी, शनि शिगणापूर येथे जाणाऱ्या भाविकांना याचा मोठा फायदा होणार  आहे.

हे सुद्धा वाचा : शरद पवारांचे सरकार काँग्रसेने पाडले; राज्यसभेत मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

युपीए सरकारचा काळ देशाच्या इतिहासातील ‘द लॉस्ट डेकेड’; नरेंद्र मोदींचा विरोधकांवर प्रहार

हिंदुत्ववाद्यांच्या मैदानात राहुल गांधींनी केले नरेंद्र मोदींना चीतपट!

सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत
सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसही आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. सोलापूरहून सकाळी ६.०५ वाजता सुटून दुपारी १२.३५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. परतीच्या दिशेने ती सीएसएमटी येथून दुपारी ४.०५ वाजता सुटेल आणि रात्री १०.४० वाजता सोलापूरला पोहोचेल. संपूर्ण प्रवास साडेसहा तासांत पूर्ण होईल. सध्या मुंबई ते सोलापूरदरम्यान धावणारी सिद्धेश्वर एक्स्प्रेस आठ तासांत प्रवास पूर्ण करते. त्यामुळे वंदे भारतच्या प्रवाशांचा दीड तास वाचणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, लोणावळा, पुणे आणि कुर्डुवाडी येथे थांबेल. ही ट्रेन लोणावळा ते सोलापूर दरम्यान 110 किमी, सीएसएमटी ते कर्जत दरम्यान 105 किमी आणि कर्जत ते लोणावळा दरम्यान 55 किमी प्रति तास वेगाने धावेल. याचा फायदा सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, आळंदी येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी