29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमुंबईमुंबई उपनगर जिल्ह्यात विकासाची कामे सुरु : आदित्य ठाकरे

मुंबई उपनगर जिल्ह्यात विकासाची कामे सुरु : आदित्य ठाकरे

टीम लय भारी

मुंबई : मुंबईच्या विकासासाठी कोणताही भेदभाव न करता विविध कामांना मंजूरी देण्यात आली आहे. अनेक अडचणी असतानाही पायाभूत सुविधा चांगल्या करण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे असले तरी जोड शहरे आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये महापालिका, म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए, पीडब्ल्यूडी, पोलीस अशा विविध एजन्सींमार्फत कामे होत असतात(Aditya Thackeray : Development work begins in Mumbai suburban).

ईज ऑफ लिव्हींग’ आणि ‘ईज ऑफ डुईंग’ यासाठी आपण सातत्याने काम करीत असून त्यासाठीचे नियोजन तयार असल्याची माहिती पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत या विविध विभागांद्वारे करण्यात येणाऱ्या विकासकामांमध्ये समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने नोडल अधिकारी नियुक्त केला जाईल. जेणेकरुन विकासकामांचा पाठपुरावा करताना विविध लोकप्रतिनिधी तसेच सदस्यांना अडचणी जाणवणार नाहीत.

कोरोना: आदित्य ठाकरेंनी दिला हा इशारा

यावर दुष्मनांचाही विश्वास बसणे कठीण, अमित शाह मोदींबद्दल असं बोलणार नाही : शिवसेना

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोणताही भेदभाव न करता ‘इज ऑफ लिव्हिंग’ आणि ‘इज ऑफ डुईंग’च्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन प्रत्येक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.नागरिकांचे चांगले स्वास्थ्य, निरोगी आयुष्याला प्राधान्य दिल्याचे सांगून येत्या काळात शहर जागतिक दर्जाचे बनविण्यासाठी प्रयत्न आपण करत आहोत.

विविध ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण आधुनिक बसथांब्यांची उभारणी, विविध चौकांच्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण रचनेचे ट्रॅफिक सिग्नल उभारणी, पूर्व व पश्चिम द्रूतगती मार्गावर सुविधायुक्त सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी, अत्याधुनिक सार्वजनिक सुविधा केंद्रे, उद्याने विकसित करणे, रेल्वे स्टेशनच्या परिसरात आधुनिक प्रवासी सुविधांची निर्मिती, छोट्या क्रीडांगणासारख्या सोईसुविधा निर्माण करणे अशी विविध विकासकामे आगामी काळात हाती घेणार असल्याची माहितीही ठाकरे यांनी दिली.

कोव्हिडच्या काळात लसीकरण हेच एकमेव “शस्त्र”

Don’t Shut Renowned Tourism Sites Amid COVID-19 Surge, Aurangabad Body Tells Aaditya Thackeray

कोविडचा मोठा प्रादूर्भाव असतानाच्या काळातही विविध विभागांनी चांगले काम केले. महापालिकेच्या कामाचे जगभर कौतुक झाले. मात्र, आता पुन्हा तिसऱ्या लाटेचा धोका आपल्यासमोर आहे. कोरोना संसर्ग वेगाने पसरतो आहे. त्यामुळे सर्वांनी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अनेक भागात कांदळवन आहेत. कांदळवनाचे संवर्धन होण्यासाठी चैन लिंक फेन्सिंग, ड्रोन सर्वे आणि सीसीटीवी या सुविधा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हा प्रशासन अधिक लक्ष देत असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी