28 C
Mumbai
Friday, July 5, 2024
HomeमुंबईMNS : मनसेच्या रडारवर आता अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मराठीत ‘अ‍ॅप’ सुरू करण्याचा दिला...

MNS : मनसेच्या रडारवर आता अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मराठीत ‘अ‍ॅप’ सुरू करण्याचा दिला इशारा

टीम लय भारी

मुंबई : अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट (amazon, flipkart) यांनी येत्या सात दिवसांत त्यांचे अ‍ॅप मराठी भाषेत सुरू करावे, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे (MNS) स्टाईलने होईल, असा इशारा मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिला आहे.

जिथे मराठीला डावलले जाते, तिथे मनसेचे आगमन होते, असे जणू समिकरणच बनले आहे. त्यामुळेच, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आपला मोर्चा अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांकडे वळवला आहे.

कोरोना काळात माणसाला डिजिटल माध्यमांशिवाय पर्याय नव्हता. तर, आता लहान मुलांच्याही हाती स्मार्टफोन आले आहेत. त्यामुळे, सर्वकाही डिजिटल होताना दिसत असून आॅनलाईन शॉपिंग साईटचीही क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच, नवरात्री उत्सवाच्या मुहूर्तावर फ्लिपकार्ट आणि अमेझॉनसारख्या शॉपिंग साईट्सने आॅनलाईन खरेदीवर मोठ्या आॅफर सुरू केल्या आहेत. इंग्रजी, हिंदी आणि दक्षिणेतील काही भाषांसह हे अ‍ॅप भारतात काम करतात. पण, या अ‍ॅपसाठी मराठी भाषेचा वापर होत नसल्याने मनसेनं आक्रम पवित्रा घेतला आहे.

महाराष्ट्रात गेल्या 5 ते 6 वर्षांपासून या कंपन्या कार्यरत आहेत. इंग्रजी, हिंदी या भाषेतून कंपनीतर्फे ग्राहकांसोबत व्यवहार केले जातात. विशेष म्हणजे दक्षिण भारतातील तमिळ, तेलुगू या भाषांमध्येही हे अ‍ॅप कार्यरत आहेत. मात्र, मराठी भाषेत हे अ‍ॅप कार्यरत नसल्याने मनसेनं नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी