26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमुंबईपवईत विकेंड लॉकडाऊनला उस्फुर्त प्रतिसाद

पवईत विकेंड लॉकडाऊनला उस्फुर्त प्रतिसाद

टीम लय भारी

मुंबई  :- महाराष्ट्र राज्यात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवार आणि रविवार या दोन दिवशी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली. त्याची १० व ११ एप्रिल रोजी विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली असता पवईतील व्यापारी वर्ग व जनतेने उस्फुर्त असा प्रतिसाद दिलेला दिसत आहे.

पवईतील हिरानंदानी संकुल, आय.आय.टी मार्केट आणि मेनगेट या विभागात मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग व्यवसाय करत असतात आणि आय.आय.टी मार्केट लगत असलेला कामगार नाका देखील नेहमी गजबजलेल्या असतो परंतु या विकेंड लॉकडाऊनचे पुर्णतः पालन करीत शुकशुकाट दिसून आला.

कामगार नाक्यावर हातावर पोट असणारे पवईतील नागरिक कामाच्या शोधात तासनतास वाट बघत असतात त्यात विकेंड लॉकडाऊन लागल्याने एकीकडे नैराश्य जरी आले असले तरी राज्यातील जनतेच्या आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तिच्या हितासाठी आम्ही याचे पालन करत आहोत असे कामगार नाक्यावरील नागरिकांनी आमच्या सोबत बोलताना सांगितले.

पवई अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण पणे कडकडीत विकेंड लॉकडाऊन पालन झाल्याचे आज दिसून आले. परंतु अत्यावश्यक सेवेत भाजीपाला दुकाने चालु ठेवण्यासाठी सरकार कडून आदेश आले असताना देखील आय.आय.टी मार्केट लगत भाजी मंडई मध्ये पुर्णतः शुकशुकाट दिसून आला. भाजीपाला दुकाने उघडी नसल्याने नागरिकांनमध्ये नैराश्य दिसून येत आहे. असे आमच्याशी बोलताना पवईतील युवक राहुल गच्चे यांनी सांगितले.

विकेंड लॉकडाऊन संदर्भात राज्य सरकारने दिलेल्या नियमानुसार जीवन आवश्यक सेवेमध्ये जर भाजीपाला दुकाने सुरू ठेवण्यासाठी सांगितले असता. भाजीपाल्याचे दुकान खुले का नाही सामान्य लोकांना भाजीपाल्यासाठी त्रास होतो.
-राहुल गच्चे (पवईतील युवक व समाजसेवक)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी