30 C
Mumbai
Tuesday, July 2, 2024
HomeमुंबईAnil Deshmukh : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ख्रिसमसाठी जाहीर केल्या गाइडलाइन्स

Anil Deshmukh : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ख्रिसमसाठी जाहीर केल्या गाइडलाइन्स

टिम लय भारी

मुंबई : राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यातच ब्रिटनमध्ये नवे स्ट्रेन आढळून आल्याने राज्य सरकारने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नाताळ सण (Christmas) साध्या पद्धतीने आणि गृह विभागाच्या (Home Minister) मार्गदर्शक सूचनेनुसार (Guideline) साजरा करावा, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केले आहे.

गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या गाईडलाइन्स

ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळ सण साध्या पद्धतीने साजरा करावा. चर्चमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच फिजिकल डिस्टन्सिंग राखले जाईल याची प्रामुख्याने काळजी घ्यावी. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.

शारिरीक अंतर व स्वच्छतेचे नियम

चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री असे काही गोष्टी ठेवल्या जातात. ते पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. त्याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. चर्चमध्ये प्रभू येशु ख्रिस्त यांचे स्तुतीगीत (Choir) गाण्यासाठी फक्त 10 गायकांचा (Choirsters) समावेश करावा. वेगवेगळे माईक वापरून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

आपल्या घरातील 60 वर्षावरील नातेवाईक तसेच 10 वर्षाखालील लहान मुलांना त्यांच्या सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो घराबाहेर जाणे टाळून घरातच नाताळ सण साजरा करावा.

आयोजकांसाठी सूचना

आयोजकांनी ऑनलाईन प्रार्थनेची (Online Masses) सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी. ज्याचा लाभ घरी असणाऱ्या व्यक्तींना होईल. तसेच कोणत्याही प्रकारची गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकीचे आयोजन करु नये. फटाक्यांची आतिषबाजी करु नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोर पालन करावे.

31 डिसेंबरची प्रार्थना संध्याकाळी 7 वाजता करावी

31 डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना ही मध्यरात्री आयोजित न करता संध्याकाळी सात वाजता किंवा त्यापूर्वीच करण्याचे नियोजन करता येईल का ते पहावे. असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी