31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमुंबईलोटांगण घातले असते; अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना खोचक टोला

लोटांगण घातले असते; अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :- आषाढी एकादशीनिमित्ती विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे हस्ते भक्तीमय वातावरणात पार पडली. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे सुपूत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. मुंबईतून पंढरपूरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत गेले. यानंतर तेथील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावाही घेतला. यावरून आता अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे (Atul Bhatkhalkar has slammed Chief Minister Uddhav Thackeray).   

मुंबईत पावसाच्या रौद्ररुपामुळे चेंबूर येथे मोठी दुर्घटना घडली. यासह उपनगर आणि जवळच्या पालघर, रायगड जिल्ह्यांनाही पावसाने झोपडले. मुंबईत शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ३३ नागरिकांचा बळी घेतला. बहुतेक नागरिकांचा मृत्यू दरड आणि भिंत कोसळून झाला, तर विविध दुर्घटनांमध्ये १२ नागरिक जखमी झाले. यारून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

पंढरपुरात पोहचताच मुख्यमंत्र्यांनी घेतली कोरोना संदर्भात बैठक

स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री सहपत्निक झाले पंढरपूरला रवाना…

स्वतः ड्रायव्हिंग करत शनिवारी चेंबूरपर्यत गेले असते तर लोटांगण घातलं असतं, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. तसेच याआधी, मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर…, असे ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घटनास्थळी जाऊन भेट न देण्यावरुन बोचरी टीका केली होती (Chief Minister Uddhav Thackeray had criticized Bochari for not visiting the spot).

मुंबईत पावसाने घातले थैमान; लोकांचे जनजीवन विस्कळीत

On ‘Ashadhi Ekadashi’, Uddhav Thackeray Prays For End Of COVID-19 Crisis

Atul Bhatkhalkar has slammed Chief Minister
अतुल भातखळकर आणि उध्दव ठाकरे

तसेच, चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील डोंगरावर वसलेल्या न्यू भारत नगर या झोपडपट्टीवर भाभा अणुसंशोधन केंद्राची (बीएआरसी) संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत १९ नागरिकांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. तसेच विक्रोळीतील सूर्य नगर येथील पंचशील चाळीतील सहा घरांवर रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दरड कोसळून १० नागरिकांनी जीव गमावला आणि पाच जण जखमी झाले. भांडुपच्या महाराष्ट्र नगर परिसरातील अमर कौर विद्यालायाशेजारील घराची भिंत कोसळून सोहम थोरात या १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर अंधेरी आणि पोयसर येथे विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी