31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्रीडाIndia T-20 World Cup Win : भारताच्या टी-20 विश्वचषक विजयाला 15 वर्षे...

India T-20 World Cup Win : भारताच्या टी-20 विश्वचषक विजयाला 15 वर्षे पूर्ण!

15 वर्षांपूर्वी याच दिवशी भारतीय संघ टी20 विश्वचषक विजेता बनला होता. अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेट जगतातील हा पहिला टी20 विश्वचषक होता आणि भारतीय संघ पूर्णपणे तरुणांनी भरलेला होता. सचिन, सौरव आणि द्रविड या त्रिकुटाशिवाय टीम इंडिया हा विश्वचषक जिंकू शकेल, अशी कुणालाही अपेक्षा नव्हती पण धोनी ब्रिगेडनं सगळे अंदाज खोटे ठरवले.

भारतीय क्रिकेट संघाने आजवर अनेक विक्रम रचले. टीम इंडियाला आजवर अनेक कर्णधार देखील मिळाले. मात्र, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने रचलेले काही विक्रम आजवर कोणालाही मोडीत काढता आलेले नाहीत. त्यातीलच एक विक्रम म्हणजे 2007 साली झालेल्या टी20 विश्वचषकातील विजय. 2007 साली आयसीसीने पहिल्यांदाच टी20 क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन केले होते. त्याचवर्षी झालेल्या वनडे विश्वचषकात भारतीय संघाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर संघातील वरिष्ठ खेळाडूंवर अगदी टोकाची टीका करण्यात आली. याच कारणाने संघातील वरिष्ठ खेळाडूंनी टी20 विश्वचषकात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत एका युवा खेळाडूंच्या संघाला विश्वविजेता बनवले. आज अर्थात 24 सप्टेंबर रोजी भारताच्या या ऐतिहासिक विजयाला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत.

15 वर्षांपूर्वी याच दिवशी भारतीय संघ टी20 विश्वचषक विजेता बनला होता. अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेट जगतातील हा पहिला टी20 विश्वचषक होता आणि भारतीय संघ पूर्णपणे तरुणांनी भरलेला होता. सचिन, सौरव आणि द्रविड या त्रिकुटाशिवाय टीम इंडिया हा विश्वचषक जिंकू शकेल,  अशी कुणालाही अपेक्षा नव्हती पण धोनी ब्रिगेडनं सगळे अंदाज खोटे ठरवले. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया ग्रुप-डी मध्ये होती. या गटात पाकिस्तान आणि स्कॉटलंडचे संघही होते. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्याने भारताने येथे आपल्या मोहिमेची सुरुवात केली. या सामन्यात पावसामुळे एकही चेंडू टाकता आला नाही आणि दोन्ही संघांना 1-1 गुणांवर समाधान मानावे लागले. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात जबरदस्त सामना झाला, ज्याने साहसाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या.

हे सुद्धा वाचा –

Amit Shah Bihar Visit: ‘नितीश कुमारांनी भाजप आणि बिहारच्या जनतेशी विश्वासघात केला’

Infosys founder Narayan Murthy: ‘भारताने आर्थिक क्षेत्रात मनमोहन सिंह पंतप्रधान असताना म्हणावी तशी प्रगती केली नाही’

MMS Scandal in Bhopal: चंदीगडनंतर आता देशातील आणखी एका विद्यापीठातील एमएमएस स्कँडल उघड!

पाकिस्तानविरुद्धच्या गट सामन्यात भारताने खराब सुरुवातीनंतर 141 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ निर्धारित षटकात केवळ 141 धावाच करू शकला आणि सामना बरोबरीत सुटला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तान संघाला विजयासाठी दोन चेंडूत एक धाव हवी होती, पण मिसबाहला एकही धाव घेता आली नाही. शेवटी, सामन्याचा निर्णय बॉल आऊटने घेण्यात आला, जिथे तिन्ही भारतीय गोलंदाजांनी यष्टी उधळल्या, परंतु एकाही पाकिस्तानी गोलंदाजाला स्टंपवर चेंडू टाकता आला नाही. या विजयानंतर भारताने दुसरी फेरी गाठली.

पुढील फेरीत टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्याशी होणार होता. येथील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून 10 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. भारताला आता त्यांचे पुढील दोन सामने कोणत्याही किंमतीत जिंकायचे होते.  भारताचा दुसरा सामना इंग्लंडविरुद्ध झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने गंभीर आणि सेहवागच्या अर्धशतकांच्या जोरावर चांगली सुरुवात केली. डाव आणखी स्फोटक पद्धतीने संपला. 19व्या षटकात युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला 6 चेंडूत 6 षटकार ठोकले. युवीने अवघ्या 12 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हा विक्रम आजही अबाधित आहे. येथे खेळताना भारताने 218 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात इंग्लंडला 200 धावांवर रोखून सामना जिंकला. त्याचप्रमाणे पुढील सामन्यातही भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होता. येथेही युवराजने 30 चेंडूत 70 धावांची जलद खेळी करत टीम इंडियाला 188 धावांपर्यंत नेले. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियानेही दमदारपणे लक्ष्याचा पाठलाग केला पण त्यांना केवळ 173 धावांपर्यंत मजल मारता आली. यावेळी वेगवान गोलंदाज श्रीशांतने 4 षटकात 12 धावा देत 2 बळी घेतले.

अंतिम सामन्यात टीम इंडिया पुन्हा एकदा पाकिस्तानसमोर होती. गौतम गंभीरच्या 75 धावांच्या जोरावर भारताने पाकिस्तानला 158 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानची सुरुवात खराब झाली पण संघ घरंगळत लक्ष्याच्या जवळ आला. यादरम्यान अनेकदा सामन्याचे फासे इकडून तिकडे फिरत राहिले. शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 13 धावांची गरज होती आणि त्यांची फक्त एक विकेट शिल्लक होती. जोगिंदर शर्मा हे ओव्हर करत होता. या षटकात जोगिंदरने पहिल्या दोन चेंडूत 7 धावा दिल्या होत्या, मात्र षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने मिसबाह-उल-हकला पॅव्हेलियनमध्ये पाठवून भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. यावेळी श्रीसंतने टीपलेला मिसबाहचा झेल संस्मरणीय ठरला.

विशेष बाब म्हणजे द्रविड, सचिन, गांगुली यांसारखे दिग्गज खेळाडू संघात नसताना एका युवा कर्णधाराकडे भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी आली. शिवाय संघात अनुभवी खेळाडूंची कमतरता होती. इतर संघांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला कोणताही खेळाडू संघात सामील नव्हता. तरीही महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वशैलीच्या जोरावर भारताने हा इतिहास रचला आणि पहिल्या वहिल्या आयसीसी टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. त्यानंतर खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅप्टन कूल धोनी नावाच्या वादळाला सुरुवात झाली. आणि पुढे जाऊन त्याने भारताला तिन्ही आयसीसी चषकांचे विजेतेपद पटकावून दिले. अशी कामगिरी करणारा धोनी आजवरचा जगातील पहिला आणि एकमेव कर्णधार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी