29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रDevendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना खेळायचीय 20-20 मॅच...

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना खेळायचीय 20-20 मॅच…

रस्ते विकासाचाचे प्लानिंग स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. दोन ते सव्वादोन वर्षांत चांगली विकास कामे करणार आहोत. आम्हाला 20-20 ची मॅच खेळायची आहे असे सांगून देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामाचे गुपी सांगितले.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आता कात टाकणार आहे. समृद्धी महामार्गानंतर आता नागपूर गोवा महामार्ग सुसाट होणार आहे. रस्ते विकासाचाचे प्लानिंग स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. दोन ते सव्वादोन वर्षांत चांगली विकास कामे करणार आहोत. आम्हाला 20-20 ची मॅच खेळायची आहे असे सांगून देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामाचे गुपी सांगितले. आता नागपूर ते गोवा महामार्ग हा समृद्धी महामार्गासारखा करण्यात येणार आहे. नागूपर ते गोवा महामार्ग  मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्त्वाचा दूवा ठरणार आहे. राज्यातील कोणत्याही भागात 8 ते 10 तासांमध्ये पोहोचता आले पाहिजे असे रस्ते तयार करण्याची योजना आखण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कमी वेळात आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे. याचे स्पष्टीकरण देतांना त्यांनी आम्हाला 20-20 मॅच खेळून पुढची निवडणूक जिंकायची आहे असे स्पष्टीकरण‍ दिले. हे सरकार काम करणारे सरकार आहे. हे सरकार फायलींवर बसणारे सरकार नाही अशी टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर केली. आमच्याकडे दोन ते सव्वादोन वर्षे आहेत. त्यामुळे आम्हाला वेगाने चांगला विकास करायचा आहे. आम्हाला 20-20 मॅच खेळायाची आहे, असेही ते यावेळी म्हणाले. तुम्ही आम्हाला अडचणी सांगा, आम्ही त्या सोडवू असेही त्यांनी यावेळी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडून विदर्भाला संपूर्ण सहाकार्य मिळेल. आमच्याकडे ब‍िल्डर्स आणि नरेडको ही संघटना आहे.

या संघटनेकडून आम्ही तुमचे प्रश्न सोडवू असे आश्वासान देखील देवेंद्र फडणवीस यांनी द‍िले. राज्याचे मुख्यमंत्रीपद असतांना मी रेराची सुरूवात केली. रेरा कायद्यामुळे विश्वासार्हता प्राप्त झाली आहे. काही बांधकाम व्यवसाय‍िकांनी केलेल्या फसवणुकीमुळे लोकांचा विश्वास उडाला होता. महाराष्ट्रात रेरा कायद्यामुळे भ्रष्टाचार कमी झाल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे विदर्भाचा कायापालट होणार आहे. समृद्धी महामार्ग हा नेक्स्ट इकोनॉमीकल कॅरीडोर असणार आहे. मुंबई एमएमआरडीमध्ये तीन लाख कोटी रुपये इन्फ्रास्टक्चरसाठी खर्च करण्यात आले असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

हे सुद्धा वाचा

MMS Scandal in Bhopal: चंदीगडनंतर आता देशातील आणखी एका विद्यापीठातील एमएमएस स्कँडल उघड!

Drug racket busted in Bengaluru: बॉलिवूडनंतर आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत ड्रग्जचा शिरकाव! एका अभिनेत्याला अटक

Yogi : योगींच्या राज्यात चाललंय काय……

समृद्धी महामार्ग हा मुंबई-गोवा महामार्गानंतर सुरू झालेला महामार्ग सद्या सुसाट वेगाने पळत आहे. परंतु मुंबई गोवा महामार्गाचे काम सुमारे 12 वर्षांपासून सुरू आहे. मात्र अजून ते पुर्णत्वास गेलेले नाही. या महामार्गावर अनेक सम्यांना तोंड द्यावे लागते. नवीमुंबई ते माणगावपर्यंत या महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. ही समस्या दरवर्षीचीच आहे. त्यावर नागपूर गोवा महामार्गामुळे कायम स्वरुपी तोडगा निघायला हवा अशी नाग‍‍रिकांची अपेक्षा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी