29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबई'बीबीसी'ची जिहादी ब्राईड शमीमा बेगम पुन्हा वादात ; ब्रिटनवासियांचा कडाडून विरोध

‘बीबीसी’ची जिहादी ब्राईड शमीमा बेगम पुन्हा वादात ; ब्रिटनवासियांचा कडाडून विरोध

गुजरात दंगलीवर आधारित ‘बीबीसी : द मोदी क्वेश्चन’ या माहितीपटावरून देशात बराच गदारोळ झाला होता. नरेंद्र मोदी सरकारने ही डॉक्युमेंटरी ब्लॉक केल्यानंतर यासंबंधीचे ट्विट शेअरिंगही थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ‘बीबीसी’ची ही डॉक्युमेंटरी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यानंतर आता ‘बीबीसी’ची आणखी एक डॉक्युमेंटरी ‘द शमीमा बेगम स्टोरी’ वादात सापडली आहे. मात्र, ब्रिटन सरकारने त्यावर बंदी घातली नसून ब्रिटनच्या नागरिकांनीच या माहितीपटाला जोरदार विरोध केला आहे. जगातील सर्वात क्रूर समजली जाणारी दहशतवादी संघटना आयसिस या संघटनेत ‘जिहादी ब्राईड’ म्हणून परिचित असलेली शमीमा बेगम हिच्यावर हा माहितीपट आधारित आहे. ‘द शमीमा बेगम स्टोरी’ या माहितीपटात शमिमाचे उदात्तीकरण करण्यात आल्याचा आरोप ब्रिटनमधील नागरिकांनी केला आहे. (BBC’ documentary the Shamima Begum story in controversy again; Strongly opposed by the British)

BBC documentary the Shamima Begum story in controversy again

‘इस्लामिक स्टेट’मध्ये (IS) भरती होण्यासाठी शालेय विद्यार्थिनी असतानाच शमिमा बेगमने ब्रिटनमधून पळ काढला होता. या सर्व गोष्टींमुळे लोकांमध्ये तिच्याबद्दल जो क्रोध आहे, त्याची तिला कल्पना आहे. एका वर्षांपासून सुरु असलेल्या या मुलाखतीत तिने धक्कादायक खुलासे केले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव तिचे ब्रिटनचे नागरिकत्व काढून घेण्यात आले होते. यासंदर्भात आयसिसच्या दहशतवाद्यांनी सूचनादेखील दिल्या होत्या. पण २०१५ मध्ये तिने स्वतःच प्रवासाचे नियोजन केले होते. सीरियाला जाणार्‍या तिच्या विमानाचा संपूर्ण लेखाजोखा देताना, तिने बीबीसी पॉडकास्ट ‘द शमीमा बेगम स्टोरी’ला सांगितले की, ब्रिटनमधून पलायन केल्यानांतर आपण पुन्हा त्या देशात परत जाऊ, ही अपेक्षाच मी सोडून दिली होती. लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे. लोकांच्या जीविताला तिच्यापासून धोका आहे, त्यांच्या राहणीमानावर तिच्या वास्तव्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, याच नजरेने तिच्याकडे सर्वजण पाहात आहेत, याची तिला खात्री आहे. पण लोक ज्या नजरेने पाहात आहेत त्या प्रकारची व्यक्ती आपण नाही आहोत, असे ती म्हणाली.

२०१९ मध्ये आयसिसच्या ‘खिलाफत’चा पराभव झाल्यानंतर हजारो पुरुष, स्त्रिया आणि मुलांना सीरियाच्या बंदी शिबिरांमध्ये आणि तुरुंगात बंदी म्हणून ठेवण्यात आले. या सर्वांमध्ये शमिमा बेगमची कहाणी हृदयद्रावक असल्याचे या माहितीपटात म्हंटले आहे. सिरीयात असताना शमीमाने २३ व्या वर्षीच तीन मुलांना जन्म दिला होता. मात्र, तिची सर्व मुले दगावली. शमिमाला लंडनमधे परतायचे असून नागरिकत्व पुन्हा मिळवण्यासाठी तिने ब्रिटन सरकारविरोधात नायालयात दाद मागितली आहे. लैंगिक शोषणासाठी मानवी तस्करीचा शमिमा बळी पडली आहे का आयसिसमध्ये ती स्वतःहून भरती होण्यासाठी गेली होती याबाबत न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

BBC' documentary the Shamima Begum story in controversy again
२०१९ मध्ये ISIS चा खात्मा झाल्यानंतर शमीमा बेगम आणि तिच्यासारख्या हजारो मुली सीरियातल्या छळछावण्यांमध्ये खितपत पडल्या आहेत.

वयाच्या १५ व्या वर्षीच आयसिसचे आकर्षण
वयाच्या १५ व्या वर्षीच शमिमा बेगमने आयसिसमसध्ये भरती होण्यासाठी ब्रिटनमधून पळ काढला. त्यानंतर तिला ISIS BRIDE म्हणून ओळखले जाऊ लागले. २०१९ मध्ये ISIS चा खात्मा झाल्यानंतर शमीमा बेगम आणि तिच्यासारख्या हजारो मुली सीरियातल्या छळछावण्यांमध्ये किंवा तुरुंगांमध्ये जेरबंद आहेत. ब्रिटनने या सगळ्या मुलींचे नागरिकत्व काढून घेतले आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात या मुलींनी नायायालयात धाव घेतली आहे.

आत्मघातकी हल्लेखोरांसाठी जॅकेट बनविण्यात तरबेज
शमीमा बेगम बांगलादेशी वंशाची ब्रिटिश नागरिक आहे. २०१५ मध्ये तीने दोन मुलींसह आयसिस या दहशतवादी संघटनेत येण्यासाठी ब्रिटनमधून पळून आली होती. शमिमा बेगम २०१९ मध्ये एका निर्वासितांच्या छावणीत सापडली होती. त्यावेळी ती नऊ महिन्यांची गरोदर होती. तिला मूलही झालं पण त्या मुलाचा निमोनियामुळे मृत्यू झाला. तिच्यासोबत पळालेल्या दोन मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही. आत्मघातकी हल्लेखोर जे जॅकेट वापरत असत ते जॅकेट बनविण्याचे काम शमिमा करत होती. त्यामध्ये ती तरबेज असल्याचे म्हंटले जाते. पण हे सर्व आरोप तिने फेटाळून लावले आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी