31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमुंबईमुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, आपण लवकरात लवकर लस घ्यावी असे प्रत्येकाला वाटते. परंतु लोकांच्या या भावनेशी खेळून काही लोक बोगस लसीकरण मोहीम राबवताना दिसतायत. आता याच बोगस लसीकरण मोहीम राबवणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. याची माहिती सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली (Bogus vaccination gang exposed in Mumbai).

बोगस लसीकरण मोहीम राबवणाऱ्या टोळीवर आळा घालण्यासाठी एक विशेष एसआयटी (स्पेशल इंवेस्टिगेशन टीम) स्थापन करण्यात आली आहे. आता पर्यंत बोगस लसीकरण करणाऱ्यांवर ७ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. यात 30 मे  रोजी कांदिवली पश्चिम येथील हिरानंदानी सोसायटीत 390 रहिवाश्यांना बोगस कोविशील्ड लस ही 1,260 रुपयांनी देण्यात आली होती. या प्रकरणात 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकून 12, 40,000 रुपये जप्त करण्यात आले अशी माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. त्याचबरोबर अशा अनेक ठिकाणी मुंबईत ही बोगस लसीकरण राबवण्यात आले होते (The bogus vaccination was carried out in several places in Mumbai).

Bogus vaccination gang exposed in Mumbai
लसीकरण

मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा हावरटपणा, पदोन्नतीसाठी न्यायालयाचा केला अवमान, उद्धव ठाकरेंनाही ठेवले अंधारात

‘कोरोना’ची लस घेणाऱ्यांना जडतोय नवा आजार

मुंबईतील ही सर्व 7 ठिकाणची बोगस लसीकरण मोहीम एकाच टोळीकडून करण्यात आली (The bogus vaccination campaign of all these 7 places in Mumbai was carried out by the same team). या सर्व प्रकरणात दोन मुख्य आरोपी महेंद्र प्रताप सिंग आणि मनिष त्रिपाठी असून त्या दोघांची बँक खाते गोठवण्यात आली आहेत. या लसीकरण मोहीममध्ये जी गाडी वापरण्यात येत होती ती पण पोलिसांनी जप्त केली आहे.

नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

Coronavirus News LIVE Updates: Delhi Reports 85 Covid Cases, Lowest this Year

Bogus vaccination gang exposed in Mumbai
बोगस लसीकरण

शिवम हॉस्पिटलचा डेंटिस्ट डॉ. मनिष त्रिपाठी याचे स्वतःचे नर्सिंग होम आहे. या नर्सिंग होंमधील त्याच्या विद्यार्थ्यांना लसीकरण देण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. या सर्व विद्यार्थ्यांना बोगस लसीकरण होत असल्याची माहिती असल्यामुळे त्यांनासुद्धा आरोपी ठरवण्यात आले आहे.

लोकांनी घाबरून न जाता कुठेही बोगस लसीकरण होत असेल तर त्याची माहिती आपल्या जवळच्या पोलिस ठाण्यात द्यावी ही विनंती.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी