30 C
Mumbai
Friday, July 5, 2024
Homeमुंबईcorona : कोरोना वॅक्सीनसाठी अगोदर करावे लागणार रजिस्ट्रेशन, जाणून घ्या कोणत्या 12...

corona : कोरोना वॅक्सीनसाठी अगोदर करावे लागणार रजिस्ट्रेशन, जाणून घ्या कोणत्या 12 फोटो आयडींची असेल आवश्यकता

टिम लय भारी

मुंबई : कोरोना (corona) महामारीचा सामना करण्यासाठी जगभरात व्हॅक्सीन बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भारतात सुद्धा कमीतकमी आठ व्हॅक्सीनवर काम सुरू आहे. यापैकी तीन ते चार व्हॅक्सीन लवकर उपलब्ध होण्याची होण्याची शक्यता आहे. हे पाहता सरकारने राज्यांसाठी लसीकरण अभियानासाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. कुणाला आणि कशाप्रकारे व्हॅक्सीन देण्यात येईल हे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. लसीकरणासाठी बनवण्यात आलेल्या प्रत्येक केंद्रावर रोज एका सत्रात 100-200 लोकांना लस दिली जाईल आणि 30 मिनिटांपर्यंत त्यांना देखरेखीखाली सुद्धा ठेवण्यात येईल.

मार्गदर्शक तत्वांनुसार, सर्वप्रथम प्राथमिकतेच्या आधारावर 30 कोटी लोकांना लस देण्याची तयारी केली आहे. यामध्ये कोरोना रूग्णांवर उपचार आणि देखभाल करणारे डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि अन्य फ्रंटलाईन वर्कर्स, 50 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांचा सहभाग आहे. याशिवाय, या गटात 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अशा लोकांना सुद्धा ठेवले आहे, जे अगोदरच कोणत्या ना कोणत्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. लस उपलब्ध झाल्यानंतर इतर लोकांना लस दिली जाईल.

12 कागदपत्रांची असेल आवश्यकता

लसीकरणाच्या प्रत्येक सत्रात रोज केवळ 100 लोकांनाच लस दिली जाईल. हे लोक अगोदरच रजिस्टर्ड असतील. आयत्यावेळी रजिस्ट्रेशन करण्याची कोणतीही व्यवस्था असणार नाही. रजिस्ट्रेशनसाठी मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पेन्शनच्या कागदपत्रांसह 12 कागदपत्रांपैकी एकाची आवश्यकता असेल. केंद्रावर लसीकरण झाल्यानंतर त्या लोकांना देखरेखीखाली ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था असेल, तिथे आणखी एक टीम लावून रोज 200 लोकांना लस दिली जाऊ शकते.

केंद्रावर पाच सदस्यांची एक टीम असेल. यामध्ये एक लसीकरण अधिकारी, एक अतिरिक्त अधिकारी, एक सुरक्षा रक्षक, लस दिल्यानंतर देखरेख करणारा एक अधिकारी यांचा समावेश असेल.

याशिवाय दोन असे लोक असतील जे लस घेण्यासाठी आलेल्या लोकांची पडताळणी करतील. ते ओळखपत्राची तपासणी करून सत्यापित करतील. तसेच गर्दी नियंत्रित करणे, माहिती आणि संवादासाठी जबाबदार दोन-सहकारी कर्मचारी असतील. मार्गदर्शक तत्वांनुसार, लस देण्यासाठी 50 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांची ओळख पटवण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या नवीन मतदार यादीचा उपयोगी केला जाईल.

कोरोना लसीकरणाबाबत हे आहेत प्रमुख मुद्दे

* पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस दिली जाईल.
* यामध्ये 50 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाचे 26.5 कोटी लोक असतील.
* त्यांना 50-60 वर्ष आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये विभागले जाऊ शकते.
* डॉक्टर, नर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्ससह एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि इतर.
* अगोदरपासून गंभीर रोगांनी ग्रस्त 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे 2.5 कोटी लोक
* 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची ओळख पटवण्यासाठी नवीन मतदार यादीचा वापर.
* उत्तर प्रदेशात 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या सर्वात जास्त.
* महाराष्ट्र आणि बंगालमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने पीडित सर्वात जास्त.
* केरळात एक तृतियांशपेक्षा उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने पीडित 50 वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक जास्त.
* जिथे प्रतीक्षा आणि देखरेख कक्षाची अतिरिक्त व्यवस्था असेल तिथे एका सत्रात 200 लोकांचे लसीकरण.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी