29 C
Mumbai
Sunday, July 7, 2024
HomeमुंबईCoronavirus : वानखेडे स्टेडिअम कोरोनाबाधित रुग्णांसाठी योग्य नाही

Coronavirus : वानखेडे स्टेडिअम कोरोनाबाधित रुग्णांसाठी योग्य नाही

टीम लय भारी

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा वेगाने वाढत आहे. मुंबईतील रुग्णालयेही कोविड19 (COVID19) च्या रुग्णांनी भरली आहेत. महापालिका आणि सरकारकडून मुंबईत कोरोना (Coronavirus) रुग्णांवर उपचारासाठी गोरेगाव, महालक्ष्मी रेस कोर्ससह विविध ठिकाणी कोविड आणि आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून वानखेडे स्टेडिअम सुद्धा तात्पुरते कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांसाठी द्यावे, अशी मागणी महापालिकेने एमसीएला केली होती. या संदर्भातील पत्र सुद्धा महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आले होते. आणि मुंबईच्या महापौर आणि मुख्यमंत्र्यांनी येथे पाहणीही केली होती.

मात्र महापालिका आयुक्त इक्बाल चहल (BMC commissioner Iqbal Chahal) यांनी वानखेडे स्टेडिअम कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांसाठी योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आयुक्त इक्बाल चहल यांनी म्हटले आहे की, वानखेडे स्टेडियम हा एक चांगला पर्याय नाही. कारण ते खुले मैदान आहे आणि थोड्याच दिवसात पावसाळा सुद्धा सुरु होणार असल्याने ते एक चांगला पर्याय असू शकत नाही.

मुंबई महापालिका शाळा सुद्धा क्वारंटाइन सेंटर म्हणून उपयोगात आणणार आहे. तसेच खासगी दवाखाने नॉन कोविड रुग्णांसाठी सुरु करण्यात यावेत असेही, स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी