27 C
Mumbai
Monday, July 8, 2024
Homeमुंबईभरपावसातच गोविंदाचा दहीहंडी फोडण्याचा थरार!

भरपावसातच गोविंदाचा दहीहंडी फोडण्याचा थरार!

गुरुवारी दहीहंडी उत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच मुंबई, ठाण्यात मुसळधार सरींनी प्रवेश केला. पावसाचा मारा दिवसभर राहिल्याने गारठतच गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडली. मुंबई आणि ठाण्यात बहुतांश ठिकाणी दुपारी उशिरा गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी तयार झाले. पावसाचा अंदाज घेत गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्याचे नियोजन केले.
 कोरोनाची दोन वर्ष दूर होताच यंदाच्या वर्षी दणक्यात दहीहंडी उत्सव साजरा झाला. गर्दीचे नियम शिथील झाल्याने ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव दणक्यात साजरी झाली. दादर,परळ, धारावी येथे दहीहंडीचा उत्साह ओसंडून वाहत होता. अगोदरच पावसाच्या पाण्यात भिजलेल्या गोविंदांवर कोणीही पाणी टाकले नाही. काही ठिकाणी आठच्याऐवजी पाच थर लावले गेले. पावसाचा व्यत्यय येत असल्याने गोविंदा पथकांनी थरांची संख्या कमी केली. सायंकाळी सहापर्यंत मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर दिसून आला.
 पावसाला ब्रेक लागतात ठाण्यातील दहीहंडी उत्सवात अभिनेत्री राकुल प्रीत आपला प्रियकर निर्माता जॅकी भगनानीसह उपस्थिती लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोजित ठाण्यातील दहीहंडी उत्सवात सायंकाळच्या दरम्यान अभिनेत्री राकुल प्रीत आणि जॅकी भगनानी हजर राहिले. राकुल प्रीतनं व्यासपीठाबाहेरील फॅन्सची मागणी लक्षात घेत गर्दीत जवळ जात त्यांच्यासोबत सेल्फी काढला. राकुलची नम्रता पाहून उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
हे सुद्धा वाचा 
एकनाथ शिंदे आयोजित दहिहंडी उत्सवाला प्रियकरासोबत आली रकुल प्रीत
देशाचे नाव बदलल्याने परिस्थिती बदलणार का?
अभिनेत्री प्राजक्ता शिंदे म्हणते, तुच तुझ्या आयुष्याचा ‘ड्रायव्हर’
 अभिनेते सोनाली कुलकर्णीनंही दहीहंडी उत्सवात हजेरी लावली. सोनालीने प्रसिद्ध गाण्यांवरती ठेका धरत उपस्थितांची मन जिंकली. दहीहंडी उत्सवाचे फोटो सोनालीनं इंस्टाग्रामवरही पोस्ट केले. एरवी सायंकाळनंतर गोविंदा पथक गल्लोगल्ली फिरून पावभाजी आणि वडापावचा आनंद लुटणारे गोविंदा दिवसभर पाण्यात गारठल्याने लवकरच घरी परतले. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेला ढोल ताशांचा जोर लवकर आटोपला गेला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी