33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
HomeमुंबईEknath Shinde: एकनाथ शिंदेनी बेस्ट, आरोग्य कर्मचारी व शिक्षकांना दिवाळीचा बोनस‍ केला...

Eknath Shinde: एकनाथ शिंदेनी बेस्ट, आरोग्य कर्मचारी व शिक्षकांना दिवाळीचा बोनस‍ केला जाहीर

कोरोना व्हायरस (कोविड-19) महामारीच्या काळात कठीण परिस्थितीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. त्यांनी कर्मचार्‍यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या पण सर्वांना मुंबईकरांसाठी मनापासून काम करण्यास सांगितले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) कर्मचारी आणि शिक्षकांना दिवाळीचा सण आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यासाठी बोनस जाहीर केला. मुंबई महापालिकेचे कर्मचारी, शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना 22,500 रुपये आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन दिवाळी बोनस म्हणून देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. या निर्णयाचा लाभ मुंबई महापालिकेच्या 93 हजार कर्मचाऱ्यांसह शिक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह बेस्टच्या 29 हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.

कोरोना व्हायरस (कोविड-19) महामारीच्या काळात कठीण परिस्थितीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. त्यांनी कर्मचार्‍यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या पण सर्वांना मुंबईकरांसाठी मनापासून काम करण्यास सांगितले.

लोकसभा सदस्य राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक इक्बालसिंग चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, तसेच विविध पालिका विभागांचे अधिकारी मुख्यमंत्री शिंदेंसह बैठकीला उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा –

Western Railway News: पश्चिम रेल्वेमध्ये 1 ऑक्टोबरपासून 31 नवीन एसी लोकल होणार दाखल

Mukesh Ambani: केंद्रीय गृहमंत्रालयाने मुकेश अंबानींच्या सुरक्षेत केली वाढ; मिळाली झेड प्लस दर्जाची सुरक्षा

Adhani : आदानींच्या कंपनीला मिळाले मोठे काम

महानगर पालिकेचे आरोग्य कर्मचारी व बेस्टचे कर्मचारी यांना बोनस जाहीर केल्यानंतर शिंदे म्हणाले की, कोविड-19 च्या कठीण परिस्थितीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. मुंबईतील कोविडची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टर आणि सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. विकासकामांवर खर्च झाला पाहिजे परंतु चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन सुदृधा दिले पाहिजे. विकासकामे आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजना यांच्यात समतोल राखला पाहिजे कारण कर्मचारी आणि नागरिक हे दोन्ही समाजातील  महत्त्वाचे घटक आहे.

दिवाळी बोनसची घोषणा करताना शिंदे यांनी जनतेला दिव्यांचा सण आनंदाने साजरा करण्याचे आवाहन केले. मुंबई महानगरपालिकेशी संबंधित विकासकामे आणि कर्मचाऱ्यांशी संबंधित अडथळे प्राधान्याने सोडवले जातील. नागरिकांच्या इच्छेनुसार रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे उच्च दर्जाची होतील याची दक्षता अभियंत्यांनी घ्यावी. राज्य शासनाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने आता मुंबईकरांसाठी मनापासून काम केले पाहिजे अशा सूचना शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी