33 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
HomeमुंबईWestern Railway News: पश्चिम रेल्वेमध्ये 1 ऑक्टोबरपासून 31 नवीन एसी लोकल होणार...

Western Railway News: पश्चिम रेल्वेमध्ये 1 ऑक्टोबरपासून 31 नवीन एसी लोकल होणार दाखल

विद्यमान नियमित सेवांच्या क्षमतेला चालना देण्यासाठी, पश्चिम रेल्वेने 15 डब्यांच्या लोकल ट्रेन्सची संख्या 79 वरून 106 पर्यंत वाढवत आहे. या 15 डब्यांच्या गाड्या शनिवारी देखील धावतील. या तरतुदीनंतर उपनगरीय लोकल ट्रेन सेवेची एकूण संख्या 1,375 वरून 1,383 पर्यंत वाढेल व त्यामध्ये हार्बर मार्गावरील (Harbour Line) 112 लोकल ट्रेन सेवांचा समावेश आहे.

पश्चिम रेल्वेने (Western Railway) दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. खिश्याला परवडतील असे तिकीटांचे दर व आरामदायक प्रवासाच्या दृष्टीने लोकलच्या वाढलेल्या फेऱ्या एवढीच माफक अपेक्षा सामान्य मुंबईकरांची रेल्वे प्रशासनाकडे असते. आपल्या प्रवाशांच्या अपेक्षा लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने 31 नवीन एसी लोकल सेवा जाहीर केल्या आहेत. त्या लोकल सेवांचे नवीन वेळापत्रक 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेने राजकीय दबावाखाली (Political Pressure) 10 एसी लोकल सेवा मागे घेतल्यावर हे पाऊल उचलण्यात आले आहे. 31 एसी सेवांपैकी आठ नवीन आहेत तर उर्वरित नेहमीच्या लोकलच्या जागी आहेत. सध्या पश्चिम रेल्वे प्रशासन चर्चगेट आणि विरार दरम्यान 48 एसी  लोकल सेवा चालवते.

विद्यमान नियमित सेवांच्या क्षमतेला चालना देण्यासाठी, पश्चिम रेल्वेने  15 डब्यांच्या लोकल ट्रेन्सची संख्या 79 वरून 106 पर्यंत वाढवत आहे. या 15 डब्यांच्या गाड्या शनिवारी देखील धावतील. या तरतुदीनंतर उपनगरीय लोकल ट्रेन सेवेची एकूण संख्या 1,375 वरून 1,383 पर्यंत वाढेल व त्यामध्ये हार्बर मार्गावरील (Harbour Line) 112 लोकल ट्रेन सेवांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा –

Supreme Court Verdict: सर्वोच्च न्यायालयाने अविवाहीत महिलांचा गर्भपात व वैवाहीक बलात्कार यावर दिला ऐतिहासिक निर्णय

Mukesh Ambani: केंद्रीय गृहमंत्रालयाने मुकेश अंबानींच्या सुरक्षेत केली वाढ; मिळाली झेड प्लस दर्जाची सुरक्षा

Mukesh Ambani: केंद्रीय गृहमंत्रालयाने मुकेश अंबानींच्या सुरक्षेत केली वाढ; मिळाली झेड प्लस दर्जाची सुरक्षा

15 डब्यांच्या लोकल ट्रेन सेवांमध्ये वाढ करण्याव्यतिरिक्त मुंबईकरांसाठी 93 नवीन लोकल ट्रेन सेवा सुरू करण्यासाठी अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाईल. ऑगस्ट 2022 पासून, मुंबईच्या एसी लोकल गाड्या हे राजकीय वादाचे महत्त्वाचे कारण बनले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शहरातून एसी लोकल गाड्या पूर्णपणे मागे घेण्याचे आणि मुंबईतील कामगार-वर्गीय प्रवाशांसाठी नियमित सेवा पूर्ववत करण्याचे आवाहन केले.

तथापि, पश्चिम उपनगरातील प्रवाशी अधिक एसी लोकल गाड्यांच्या सेवांची मागणी होत आहे. रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या तिकीट आकडेवारीनुसार, एसी लोकल ट्रेन तिकीट खिडक्यांवर चांगली कामगिरी करत आहेत. सध्या, मध्य रेल्वे चार एसी लोकल गाड्यांसह 56  फेऱ्या प्रवाशांना पुरवत आहे आणि पश्चिम रेल्वे चार एसी गाड्यांसह 48  फेऱ्या चालवते. ऑगस्ट महिन्याच्या तिकीटाच्या आकडेवारीनुसार, पश्चिम रेल्वे मध्ये 17,19,659 प्रवाशांनी आणि मध्य रेल्वे मध्ये 12,37,579 प्रवाशांनी एसी लोकल सेवेचा वापर केला. मुंबईतील पहिली एसी लोकल ट्रेन 25 डिसेंबर 2017 रोजी पश्चिम रेल्वेवर सुरू झाली.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी