36 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
HomeराजकीयMallikarjun Kharge : अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 'मल्ल‍िकार्जून खरगे' आघाडीवर

Mallikarjun Kharge : अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘मल्ल‍िकार्जून खरगे’ आघाडीवर

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये अनेक जणांची नावे पुढे आली आहेत. त्यामध्ये आज मल्लीकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी देखील अर्ज भरला आहे. ‍पहिला अर्ज शिशि थरूर यांनी भरला. त्यानंतर मल्ल‍िकार्जून खरगे यांनी उमेदवारी अर्ज भरला.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये अनेक जणांची नावे पुढे आली आहेत. त्यामध्ये आज मल्लीकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी देखील अर्ज भरला आहे. ‍पहिला अर्ज शिशि थरूर यांनी भरला. त्यानंतर मल्ल‍िकार्जून खरगे यांनी उमेदवारी अर्ज भरला. खरगे यांना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी समर्थन दिले आहे. खरगे यांच्या सोबत पक्षाचे 30 मोठे नेते नामांकन भरते वेळी हजर होते. त्याचप्रमाणे झारखंडचे काँग्रेसचे नेते के.एन. त्रिपाठी यांनी देखील नामांकन अर्ज भरला. काँग्रेसमध्ये बदल घडणे आवश्यक आहे अशी मागणी करणारे नेते आनंद शर्मा तसेच मनीष तिवारी देखील यावेळी हजर होते. तर तीस नेत्यांनी खरगेंना पाठींबा दिला.

यामध्ये ए.के.अंटनी, अशोक गेहलोत, अंबिका सोनी, मुकूल वासनिक, आनंद शर्मा, अभ‍िषेक मनु सिंघवी, अजय माकन, भूपिंदर हुड्डा, दिग्विजय सिंह, तार‍िक अनवर, सलामान खुर्शीद, अख‍िलेश प्रसाद सिंह, दीपेंदर हुड्डा, नारायण सामी, वी वथ‍िलिंगम, प्रमोद तिवारी, पीएल पुनिया, अविनाश पांडे, राजीव शुक्ला, नासिर हुसैन, मनीष तिवारी, रघुवीर सिंह मीणा, धीरज प्रसाद साहू, ताराचंद, पृथ्वीराज चौहान, कमलेश्वर पटेल, मूलचंद मीणा, डॉ. गुंजन, संजय कपूर आणि विनीत पुनिया यांचा समावेश होता. खरगेंना इतक्या मोठयाप्रमाणात पाठींबा मिळत असल्याचे पाहून तसेच ते एक मोठे नेते आहेत. त्यामुळे दिग्विजय सिंग यांनी आपण अध्यक्ष पदासाठी उत्सुक नसल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा

Congress party : काँग्रेस पक्षाच्या जुलबंदीमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांचे मौन

Repo Rate बापरे ! एका वर्षात चार वेळा वाढले रेपो रेट

Adhani : आदानींच्या कंपनीला मिळाले मोठे काम

दिग्विजय सिंह यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिल्या ते म्हणाले की, मी घाबरुन पळून जाणारा नेता नाही. काँग्रेससाठी काम केले आहे. काम करत राहिन मात्र मी तीन गोष्टींसाठी समझौता करणार नाही. त्यातली पहिली म्हणजे दलित-आदिवासी, दुसरी धार्मिक भावना ब‍िघडवणे, तिसरी गांधी कुटुंबाबरोबर निष्ठा या गोष्टींसाठी मी नेहमी कट‍िब्ध राह‍िन. मी काल खरगेंची भेट घेतली. तुम्ही जर नॉमिनेशन करत असाल तर मी निवडणूक लढणार नाही. मी त्यांच्या घरी गेलो. ते वरिष्ठ नेता आहेत. त्यामुळे मी तुमच्या बरोबर निवडणूक लढणार आहे. त्यामुळे मी माघार घेतली.

अशोक गेहलोत देखील खरगेंना भेटायला गेले होते. त्यांचा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव योग्य आहे.‍ शशि थरुर म्हणाले‍ की, मल्लिकार्जुन खरगे आदरणीय आहेत. त्यामुळे ते या निवडणुकीत उतरण्याला मला आनंद आहे. झारखंड काँग्रेसचे नेता के.एन, त्रिपाठी देखील अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत अर्ज भरला आहे. आशा प्रकारे अध्यक्षपदासाठी दावा करणाऱ्यानीच खरगेंना पाठिंबा दिल्याने त्यांना अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वाढली आहे. गांधी कुटूंबाने देखील यावर विचार करत आहे. राहूल गांधी ‘ भारत जोडो’ यात्रेवर आहेत. तर प्रियंका गांधी आणि सोन‍िया गांधी यांची गुरूवारी रात्री या विषयावर बैठक झाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी