32 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरमुंबईमहिला दिन विशेष : स्त्रिया 'बोलत्या' व्हायला लागल्या तेव्हा...

महिला दिन विशेष : स्त्रिया ‘बोलत्या’ व्हायला लागल्या तेव्हा…

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९९० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. तर भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया ‘बोलत्या’ व्हायला लागल्या. (International Women’s Day Special)

आजची स्त्री पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात वर्चस्व गाजवत आहे” किती विरोधाभासाने भरलेले वाक्य आहे हे! आजही एका स्त्रीला तिची योग्यता, कार्यकुशलता सिद्ध करण्यासाठी पुरूषासोबत तुलनात्मक दृष्टीने बघितले जाते. देश स्वतंत्र झाला. पुरूषांसोबतच स्त्रीयांनाही स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. परंतु तो अधिकार केवळ नावापुरताच असल्याचे चित्र आजही आपल्याला सहज दिसुन येते. कारण आजही समाजात स्त्री पुरुष विषमता आहे. अगदी अगधिकतेने दर्शविल्या जाणाऱ्या स्त्री-पुरुष समानतेच्या काळात स्त्रीयांना स्वातंत्र्याचा हक्क मिळालेला दिसून येत नाही. मराठी साहित्‍यात देखील पुरातन काळापासून स्‍त्री-पुरुष समानतेचा धागा सापडतो. मात्र आजच्या आधुनिक युगात स्‍त्री आणि पुरुषाने एकमेकांना त्‍यांची स्‍पेस (मोकळा वेळ) देणे आणि दोघांनी एकमेकांचा आदर राखणे, हीच खरी स्‍त्री-पुरुष समानता आहे.

स्त्री व पुरुष यांचे जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोणच मुळात भिन्न असतात. परंपरेने स्त्री व पुरुष यांच्याकडे सोपविलेल्या वेगवेगळ्या विषमतावादी भूमिकांमुळे तसेच भिन्न व्यवसायांमुळे स्त्री-पुरुषांच्या लेखनातला भेद निर्माण होतो, असेही मानले जाते. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुष विषमतेचे एक-उदाहरण म्हणजे पुरुषसत्ताक समाज व संस्कृतीच्या वर्चस्व भावाने स्त्रियांना बहाल केलेल्या पत्नी-माता-गृहिणी ह्या भूमिका असो, हा युक्तीवाद मात्र न संपणारा आहे..!

महिलांनी मात्र महिलांसाठी केलेले काम, स्त्रियांचे खास वेगळे अनुभव व विषय यांचे स्त्रीवादी दृष्टिकोणातून दर्शन घडविणारे अनेक स्त्रीवादी साहित्य समाजातील महिलांच्या वेगळेपणाचा शोध घेऊ पाहत आहेत. तिला आजही सोसाव्या लागणाऱ्या वेदना आणि अडचणींतून ती मार्ग काढत आहे. समाजकल्याण, खेळ, आरोग्य, तंत्रज्ञान, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करत तीने समाजासाठी नेहमीच आदर्श ठेवला आहे.

जागतिक महिला दिन फक्त एका दिवसपुती मर्यादित न ठेवता आपण प्रत्येक दिवस स्त्रीयांना सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. पुरुषांनी महिलांचा आदर मानाने स्वीकारला, तीचे महत्व ओळखले तर हा जागतिक महिला दिन खऱ्या अर्थाने सार्थक होईल.

 हे सुद्धा वाचा : 

जागतिक महिला दिन: गुगल डुडलची महिलांच्या कर्तृत्त्वास विशेष कलाकृती समर्पित

अखेर विधीमंडळात गाजणार महिला धोरणाचा मुद्दा.!

TAIT Exam : परीक्षेपासून वंचित ठेवलेल्या विवाहित महिला उमेदवाराला परीक्षा देता येणार; उच्च न्यायालयाचे अंतरिम आदेश

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी