28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराष्ट्रीयभारतीय वंशाचा पठ्ठ्या बनलाय अमेरिकेतील पहिला दक्षिण आशियाई न्यायाधीश

भारतीय वंशाचा पठ्ठ्या बनलाय अमेरिकेतील पहिला दक्षिण आशियाई न्यायाधीश

भारतीय वंशाच्या व्यक्तिने थेट अमेरिकेत आपले आणि आपल्या देशाचे नाव मोठे केले आहे. भारतीय-अमेरिकन वकील अरुण सुब्रमण्यन यांची न्यूयॉर्कचे जिल्हा न्यायाधीश म्हणून राष्ट्रपती जो बिडेन यांनी नियुक्ती केली आहे.

सध्या संपूर्ण जगात भारतीय वंशाच्या माणसांनी धुमाकूळ घातला आहे. मध्यंतरी मूळ भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार हाती घेतला त्यावेळी संपूर्ण जगात पुन्हा एकदा भारतीय अस्मिता ठळक झाली. अशातंच आता आणखी एका भारतीय वंशाच्या व्यक्तिने थेट अमेरिकेत आपले आणि आपल्या देशाचे नाव मोठे केले आहे. भारतीय-अमेरिकन वकील अरुण सुब्रमण्यन यांची न्यूयॉर्कचे जिल्हा न्यायाधीश म्हणून राष्ट्रपती जो बिडेन यांनी नियुक्ती केली आहे. सुब्रमण्यम हे दक्षिण आशियातील पहिले न्यायमूर्ती असतील जे न्यूयॉर्कच्या दक्षिणी जिल्ह्याच्या न्यायालयात काम न्यायाधीश म्हणून काम करतील. यूएस सिनेटने मंगळवारी (7 मार्च) संध्याकाळी सुब्रमण्यन यांच्या नामांकनाला 58-37 मतांनी पुष्टी दिली. आणि सुब्रमण्यन यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.

सिनेटच्या बहुसंख्य नेत्याने पुष्टीकरण मतदानानंतर लगेचच सांगितले की त्यांनी अरुण सुब्रमण्यन यांना न्यूयॉर्कचे दक्षिणी जिल्हा (SDNY) न्यायाधीश म्हणून पुष्टी केली आहे. सुब्रमण्यन यांनी आपली कारकीर्द लोकांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी समर्पित केली आहे. दिवाणी खटल्याच्या प्रत्येक पैलूत त्याचा थेट सहभाग असतो.

हे सुद्धा वाचा

चाळीस डोके आणि पन्नास खोके ; सरकारचा संबंध डोक्याशी कमी खोक्याशी जास्त

जागतिक महिला दिन: गुगल डुडलची महिलांच्या कर्तृत्त्वास विशेष कलाकृती समर्पित

१८० वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ इमारतीच्या म्युझिअमसाठी ५ कोटी रुपये ! ; जे. जे. चा इतिहास जनतेसमोर सादर करणार

कोलंबिया लॉ स्कूलमध्ये शिक्षण घेतले
सुब्रमण्यन यांनी 2004 मध्ये कोलंबिया लॉ स्कूलमधून ज्युरीस डॉक्टर (JD) आणि 2001 मध्ये केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीमधून बीएचे शिक्षण घेतले. सुब्रमण्यन न्यूयॉर्कमधील सुस्मान गॉडफ्रे एलएलपीमध्ये भागीदार आहे जिथे त्याने 2007 मध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत सार्वजनिक आणि खाजगी संस्थांना एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त देयके दिली आहेत.

सर्वोच्च न्यायालयात काम केले आहे
अरुण सुब्रमण्यन यांनी 2006 ते 2007 या कालावधीत युनायटेड स्टेट्सच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती रूथ बेडर गिन्सबर्ग यांच्यासाठी कायदा लिपिक म्हणूनही काम केले आहे. भारतीय वंशाच्या सुब्रमण्यन यांनी आतापर्यंत चाइल्ड पोर्नोग्राफीची तस्करी, सार्वजनिक संस्थांमधील खोटे दावे आणि अनेक व्यक्तींची प्रकरणे हाती घेतली आहेत. आता सुब्रमण्यन यांना थेट अमेरिकेत न्यायाधीश पदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी मिळाली आहे. यामुळे सुब्रमण्यन यांचे समाजातील प्रत्येक स्तरावरून मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे सुब्रमण्यन हे मूळात भारतीय वंशाचे असल्याचा डंका संपूर्ण जगात जोरजोरात वाजवला जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी