26 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरमुंबईकराची विमानतळ दाऊदच्या ताब्यात

कराची विमानतळ दाऊदच्या ताब्यात

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याचा भाचा अलिशहा पारकर याला राष्ट्रीय तपास यंत्रणांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून स्फोटक बाहेर येत आहे. दाऊदचा दुसऱ्यांदा निकाह केल्याची माहिती त्याने एनआयएला दिली होती. दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim Kasakar) पाकिस्तान सरकारचा जावई असल्यासारखी त्याची त्या ठिकाणी बडदास्त राखली जात आहे. त्याच्या नातेवाईकांना तसेच त्याच्या आप्तस्वकीयांना कोणत्याही तपासणीशिवाय अथवा कोणतेही सोपस्कार पूर्ण न करता कराची विमानतळावरून थेट आतमध्ये प्रवेश दिला जातो. कराची विमानतळावर दाऊदच्या हुकुमाचे पालन होत असल्याची खळबळजनक माहिती ‘एनआयए’च्या तपासातून पुढे आली आहे. छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूट त्याची पत्नी आणि मुंबईतील एका ट्रॅव्हल कंपनीची ‘एनआयए’कडून (NIA) सुरु असलेल्या चौकशीत हा धक्कादायक खुलासा झाला आहे. (Karachi airport under control of Dawood)
दाऊदचा कराची विमानतळावर हुकूम चालत असून त्याचे अँरस्वकिय तसेच नातेवाईक यांना विमानतळवर मिग्रेशन काउंटरवर जाण्याची गरज पडत नाही. त्यांना थेट कोणत्याही तपासणीशिवाय सोडण्यात येते. तसेच ते कोणत्याही चौकशीशिवाय माघारी जाऊ शकतात. त्यामुळे कराची विमानतळावर पाकिस्तान सरकारचे नियंत्रण आहे की दाऊदचे असा प्रश्न पडतो. कराची विमानतळावर दाऊदचा पंटर छोटा शकील यांना भेटण्यास आलेल्या व्यक्तींना कोणतीही आडकाठी करण्यात येत नाही. त्यांना व्हीआयपी लाउंजमधून बाहेर काढलं जातं. त्यानंतर, थेट दाऊद इब्राहिम किंवा छोटा शकीलच्या घरी नेण्यातं येत, असे या चौकशीतून पुढे आले आहे.
सलीम फ्रुट आणि त्याच्या पत्नीने तीनदा कराचीवारी केली आहे. तसेच सलीम फ्रूट दोन वेळा छोटा शकीलला कराचीत भेटला होता. २०१३ साली सलीम फ्रूट छोटा शकीलच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी पत्नीसह कराचीला गेला होता. दुबईतून सलीम फ्रुट कराची विमानतळावर उतरल्यानंतर त्या दोघांच्या पासपोर्टवर कोणताही शिक्का न मारता त्यांना प्रवेश दिला होता. पाकिस्तानमध्ये जाऊन आल्याचे उघड होऊ नये यासाठी दुबई अथवा अन्य देशाचे तिकीट काढून पाठविण्यात येते, असा धक्कादायक खुलासा या चौकशीतून झाला आहे.
दाऊदचा भाचा अलिशहा पारकर याने दाऊद हा काराचीमधील डिफेन्स परिसरातील अब्दुल्ला गाझी बाबा दर्गाहनजीक राहत असल्याचे चौकशीत सांगितले. त्याचा मामाजान दुसऱ्यांदा बोहल्यावर चढल्याचे या चौकशीत समोर आले आहे. त्याची नवीनवेली बेगम पाकिस्तानातील पठाण कुटुंबातील असल्याचे अलीशाह याने सांगितले.

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी