27 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeमुंबईभारताच्या पाहुणीबाबत 'हे' घडणं संपाजनक; सुप्रिया सुळेंची कठोर कारवाईची मागणी

भारताच्या पाहुणीबाबत ‘हे’ घडणं संपाजनक; सुप्रिया सुळेंची कठोर कारवाईची मागणी

दक्षिण कोरियाची युट्यूबर महिला लाईव्ह स्ट्रिमींग करत असताना दोन तरूणांनी त्या महिलेसोबत अत्यंत घाणेरडी वर्तणूक करत तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना मुंबईतील खार परिसरात घडली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. भारताची पाहुणी असणाऱ्या महिलेसोबत घडलेली ही घटना अतिशय संतापजनक आणि दु:खद असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधीत तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. खार परिसरात ही महिला लाईव्ह स्ट्रिमींग करत असताना दोन तरुणांनी या महिलेशी छेडछाड सुरू केली. त्यानंतर महिलेने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केले असता, ते तिच्या पाठीमागे देखील धावल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयात मोठ्याप्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणांवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे.


या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत तरुणांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवर टॅग केले आहे. या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, ”खार, मुंबई येथे दोन तरुणांनी कोरियन महिलेची छेड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ही महिला ‘लाईव्ह स्ट्रिमींग’ करीत असताना हे घडले. भारताची पाहुणी असणाऱ्या या महिलेसोबतची ही घटना अतिशय संतापजनक व दुःखद आहे.
या अशा अतिउत्साही लोकांमुळे देशाची प्रतिमा मलिन होते. प्रत्येकाची सुरक्षा व त्यांना सुरक्षित वातावरण देणे ही सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे. माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की, हा प्रकार अतिशय गंभीर असून पर्यटकांना त्रास देणाऱ्यांना चाप बसेल अशी कारवाई करणे आवश्यक आहे. यासाठी या व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याबाबत सकारात्मक विचार करावा.”

हे सुद्धा वाचा
अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना बोचरा सवाल !
सुरेश जैन यांच्या पंटरांचे जळगावात नसते उद्योग; शहर भकास करणारा म्हणे करेल विकास!
शिंदे सरकारचे ‘खोके’ नागपूरला जाणार

दरम्यान या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर समाजमध्यामातून मोठ्याप्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.


आदित्य नावाच्या ट्विटर हॅंडलवरुन हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला असून, त्यात या तरुणाने मुंबई पोलिसांना टॅग करत म्हटले आहे की, काल रात्री कोरियातील एक स्ट्रीमरला खारमधील काही तरुणांनी त्रास दिला.यावेळी साधारण एक हजार लोकांची गर्दी तेथे होती. हे कृत्य अत्यंत घृणास्पद असून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी