30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमुंबईलालबागच्या राजाच्या चरणी आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटींचे दान! वाचा..

लालबागच्या राजाच्या चरणी आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ कोटींचे दान! वाचा..

गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहेत. विशेषतः मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये गणेशोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात रेलचेल पाहायला मिळत आहे. या शहरांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत असून यानिमित्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या चरणी लोक भरभरून दान करत असल्याचे दिसत आहे. गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस झाले असताना मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ मंडळाला गणेशोत्सवाच्या केवळ दोन दिवसांत एक कोटी रुपयांहून अधिक देणग्या मिळाल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी लालबागचा राजा मंडळाला तब्बल साठ लाखांहून अधिक देणगी प्राप्त झाली असून पुढील काही दिवसांत हा आकडा अजून मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. लालबागचा राजा मंडळाच्या म्हणण्यानुसार, गणेशोत्सवाच्या दुस-या दिवशी 60,62,000 रुपयांहून अधिक देणग्या मिळाल्या असून उत्सवाच्या दोन दिवसांत एकूण 1,02,62,000 हून अधिक देणगी प्राप्त झाली आहे.

रोख रकमेशिवाय लालबागच्या राजाला 183.480 ग्रॅम सोने आणि 622 ग्रॅम चांदीही दान म्हणून मिळाी आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी रोख रकमेत अधिक देणग्या मिळाल्या.

हे ही वाचा

कचरामुक्त होणार मुंबईचा गणेशोत्सव

‘राम मंदिर बॉम्बने उडवणार..’ धमकीच्या फोननंतर अयोध्येत अलर्ट जारी!

कोकणवासीयांसाठी अनोखी स्पर्धा; ‘खड्डे दाखवा, बक्षीस मिळवा!’

मुंबईतील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या तर्फे लालबागच्या राजाचे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येत आहे, त्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी लालबाग समितीच्या उपक्रमांना पाठिंबा दिला आहे. त्यासाठी लगणाऱ्या 24 मशिन्स अनंत अंबानीं यांनी दिल्या आहेत आहेत. त्यासोबतच लालबागचा राजा मंडळातर्फे गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी