29 C
Mumbai
Tuesday, July 2, 2024
HomeमुंबईLockdown2 : मजुरांसाठी रेल्वे सुटणार असल्याच्या चुकीच्या ‘बातमी’ने वांद्रे स्थानकात उसळली गर्दी

Lockdown2 : मजुरांसाठी रेल्वे सुटणार असल्याच्या चुकीच्या ‘बातमी’ने वांद्रे स्थानकात उसळली गर्दी

टीम लय भारी

मुंबई : ‘लॉकडाऊनमुळे ( Lockdown2 ) विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांसाठी विशेष ट्रेन सुरू होणार’ असल्याची एक चुकीची बातमी व्हायरल झाली, अन् त्यामुळेच वांद्र रेल्वे स्थानकामध्ये हजारोंची गर्दी उसळली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

अडकलेल्या ( Lockdown2 ) मजुरांसाठी विशेष जनसाधारण ट्रेन सुरू करण्याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. या चर्चेचा तपशिल सोमवारच्या एका पत्रात नमूद केला होता. या चर्चेच्या आधारे एका खासगी वृत्तवाहिनीने वेबसाईटवर बातमी प्रसिद्ध केली. ‘लॉकडाऊनमुळे ( Lockdown2 ) अडकलेल्या मजुरांसाठी विशेष जनसाधारण ट्रेन सुरू होणार’ असल्याचे या बातमीत म्हटले होते.

Coronavirus

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 10 वाजता लॉकडाऊनचा ( Lockdown2 ) कालावधी आणखी वाढविण्याची घोषणा केली. पण त्यानंतर म्हणजे सुमारे 11.30 वाजता संबंधित वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर मजुरांसाठी रेल्वे सुरू होणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली.

Lockdown2
रेल्वे प्रशासनाचे हेच ते पत्र

या बातमीमुळे वांद्रे परिसरातील मजुरांमध्ये संभ्रम निर्माण झाला, अन् रेल्वे पकडण्याच्या इराद्याने ते वांद्रे स्थानकात जमा झाले. दुपारी 2 वाजता अंदाजे दोन ते तीन हजार मजूर रेल्वे स्थानक परिसरात जमा झाले.

लॉकडाऊनमुळे ( Lockdown2 ) गेले 21 दिवस हे मजूर मुंबईत अडकून पडले आहेत. निवास व भोजनाच्या पुरेशा सुविधेअभावी त्यांचे हाल होत आहेत. अशातच मजुरांसाठी ‘विशेष ट्रेन’ची बातमी प्रसिद्ध झाली. त्यामुळेच ही गर्दी उसळल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

याबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, लोकांची गर्दी का उसळली या कारणाचा शोध आम्ही घेत आहोत. परंतु गावी जाण्यासाठी हे सगळे मजूर फार आग्रही होते. काहीही करा पण आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या, अशी मागणी हे मजूर करीत होते.

दरम्यान, हजारोचा जमाव असतानाही पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. वातावरण चिघळणार नाही याचीही काळजी पोलिसांनी घेतल्याचे दिसून आले.

हे सुद्धा वाचा

Lockdown2 : मंत्री एकनाथ शिंदेंमुळे तामिळनाडूत अडकलेल्या 160 मराठी तरूणांना मिळाला आधार

Lockdown2 : मंत्री एकनाथ शिंदेंमुळे तामिळनाडूत अडकलेल्या 160 मराठी तरूणांना मिळाला आधार

Coronavirus अजितदादांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ समितीची स्थापना

‘…तर देशात आठ लाख कोरोनाबाधित असते’ असा दावा करणारी बातमी खोटी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी