25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमुंबईठाकरे सरकारला जमले नाही, ते मनसेने ‘करून दाखविले’

ठाकरे सरकारला जमले नाही, ते मनसेने ‘करून दाखविले’

टीम लय भारी

मुंबई : ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ने एक मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे परदेशात अडकलेल्या तब्बल २ हजार मराठी तरूणांना आपल्या राज्यात परत येणे शक्य झाले आहे ( MNS helped Marathi students ). मनसेच्या या कामाबद्दल जनतेमधून कौतुक करण्यात येत आहे.

परदेशात अडकलेल्या या मराठी तरूणांना आणण्यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करणे अपेक्षित होते. परंतु हे काम मनसेने ‘करून दाखविले’ आहे, अशा शब्दांत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे ( Shalini Thackeray scathing to Thackeray Government ) यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

Mahavikas Aghadi

किरगिजीस्तान या देशात शिक्षणासाठी गेलेले हे तब्बल दोन हजार विद्यार्थी गेल्या चार महिन्यांपासून तिथेच अडकून पडले होते. किरगिजीस्तानची राजधानी बिष्केक येथे हे सगळे विद्यार्थी होते. त्यांना महाराष्ट्रात परत यायचे होते.

हे सुद्धा वाचा

सरकारने ‘Unlock’ येत्या ३१ जुलैपर्यंत वाढविला; वाचा नवे निर्बंध, नव्या परवानग्या

Coronaeffect : रुग्णालयातील भयावह परिस्थिती पाहून मनसे नेता रडला!

सावधान : विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई!

या तरूणांना परत आणण्यासाठी शालिनी ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी पंतप्रधान कार्यालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. एवढेच नव्हे तर, मनसेचे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील व शालिनी ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती ( MNS delegation was met to Governor Bhagat Singh Koshyari ).

MoneySpring

कोश्यारी यांच्याकडे मनसेने या तरूणांची व्यथा मांडली. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली. बिष्केकमधील भारतीय दुतावासाकडून त्या मराठी तरूणांना अगोदर सहकार्य केले जात नव्हते. नंतर मात्र दुतावासाच्या अधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली.

मनसेच्या मागणीची दखल घेऊन केंद्र सरकारने या मराठी तरूणांसाठी दोन विमानांची तजवीज केली. ही दोन्ही विमाने सोमवारी दुपारी बिष्केकमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत. लवकरच हे मराठी तरूण मायभूमीत पोचतील, आणि त्यानंतर आपापल्या घरी रवाना होती, अशी माहिती सूत्रांनी ‘लय भारी’ला दिली.

ठाकरे सरकारला जमले नाही, ते मनसेने ‘करून दाखविले’

‘मनसे’ने केलेल्या या मदतीबद्दल संबंधित मराठी तरूणांनी राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे, राजू पाटील, शालिनी ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी