टीम लय भारी
मुंबई : राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यामध्ये सतत कोल्ड वॉर पाहायला मिळतो. राज्यात गेल्या काही दिसवसांपासून राजकीय युद्ध सुरु आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच मनसे पक्षातील नेते शिवसेनेला डिवचण्याचे काम करत असतात. उद्धव ठाकरे यांनी सर्व शाखाप्रमुख आणि इतर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना मी पक्षाशी बांधील राहील, या आशयाचे पत्र देण्यास सांगितले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला डिवचले आहे.
संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटरला एक इमेज शेअर केली आहे. यामध्ये आदित्य ठाकरे ‘बाबा एक आयडिया सुचलीये, आपण शिवसैनिकांच्या शिवबंधन व प्रतिज्ञापत्राऐवजी त्यांना जीपीएस ट्रॅकरच बांधूया’ असे उद्धव ठाकरे यांना बोलताना दिसत आहेत. तर या फोटोत उद्धव ठाकरे यांच्या हातात देखील प्रतिज्ञा पत्र असल्याचे दिसून येत आहे.
#idea pic.twitter.com/XK60p1IHFC
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 4, 2022
राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आणि शिवसेनेमधील आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर मनसेने शिवसेना पक्षाला धारेवर धरले. पण मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी कायमच शिवसेनेवर बोचरी टीका करणारे मिम्स शेअर केले. शिवसेनेला डिवचण्यात संदीप देशपांडे हे कायमच पुढे असतात. याआधी देखील त्यांनी शिवसेनेवर टीका करणारे बरेच फोटो त्यांच्या ट्विटर आणि इतर सोशल मीडिया अकाउंटला शेअर केले आहेत.
याआधी सुद्धा संदीप देशपांडे यांनी एका कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरे यांची मिमिक्री केली होती. पण तेव्हा आदित्य ठाकरेंनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते. पण आता संदीप देशपांडेंच्या या ट्विटनंतर शिवसेनेकडून नेमके काय उत्तर देण्यात येईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर मात्र कायमच शिवसेना कार्यकर्ते विरुद्ध मनसे कार्यकर्ते असा शाब्दिक वाद पाहायला मिळतो.
हे सुद्धा वाचा :
‘तुमची लायकी आता फक्त बटण दाबण्यापूर्ती’, निलेश राणे यांचा शिवसेनेवर घणाघात
बंडोबा – भाजप युती सरकार आज बाजी मारणार? विधानसभेत बहुमत चाचणीचे आव्हान